Search
Close this search box.

नागपूर: कुत्र्यांनी तोडले चिमुकल्याचे लचके

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

घरासमोर खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्यावर रस्त्यावरील कुत्र्याच्या कळपाने अचानक हल्ला केला. मुलाला वाचविण्यासाठी धाव घेईपर्यंत जखमी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता काटोलमध्ये घडली. विराज जयवार असे मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटोलमध्ये जयवार कुटुंब राहते. त्यांचा पाच वर्षीय मुलगा विराज हा घरासमोर खेळत होता. या दरम्यान रस्त्यावरून काही मोकाट कुत्री आली. त्यामुळे विराज रस्त्याच्या कडेला उभा झाला. कुत्र्यांनी अचानक विराजवर हल्ला करीत लचके तोडणे सुरु केले. विराजने मोठमोठ्याने आरडाओरड केली. मात्र, स्वयंपाकघरात असलेल्या विराजच्या आईला त्याचा आवाज गेला नाही. तोपर्यंत कुत्र्यांनी विराजचे लचके तोडून रक्तबंबाळ केले. विराजला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विराजचा मृत्यू झाला.

admin
Author: admin

और पढ़ें