Search
Close this search box.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मोठा अपघात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

एसटीने कारला जोरदार धडक दिली. हा अपघात पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला आहे. या अपघातातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे थोडक्यात बचावले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या कारला मुंबई – पुणे महामार्गावर हा अपघात झाला आहे. एसटीने दिलेल्या धडकेमुळे जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान, या अपघातातून जगताप थोडक्यात बचावले आहेत. त्यांना तात्काळ मुंबईकडे नेण्यात आले आहे.

संग्राम जगताप यांची बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात जगताप यांच्या कारचा चुराडा झाला आहे. मात्र, संग्राम जगताप या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.

admin
Author: admin

और पढ़ें