सारा अली खाननं (Sara Ali Khan) बॉलीवूडमध्ये (Bollywood) पदार्पणापासूनच आपलं नाव कमावण्यास सुरुवात केली. तिचं दिसणं,तिचा अभिनय,नृत्य अशा एकंदरीत सर्वच गोष्टींवर तिचे चाहते फिदा आहेत. २०२० मध्ये कार्तिक आर्यनसोबत आलेला तिचा ‘लव्ह आज कल २’ हा सिनेमा फारसा चालला नसला तरी त्यातली सारा मात्र भाव खाऊन गेली. ‘अतरंगी रे’ आणि ‘कुली नं वन’ हे तिचे दोन सिनेमे ओटीटी वर प्रदर्शित झाले. या दोन्ही सिनेमांनी फारशी कमाल दाखवली नसली तरी या सिनेमातील गाण्यांवर थिरकलेली सारा सर्वांनाच अधिक भावली. आता लवकरच सारा लक्ष्मण उतेकरच्या ‘गॅसलाइट’ सिनेमात विकी कौशल आणि विक्रांत मसीसोबत दिसणार आहे.








