Search
Close this search box.

IPL 2021: टी नटराजनवर यशस्वी शस्त्रक्रिया, फोटो शेअर करत मानले डॉक्टर-BCCIचे आभार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

IPLवर एकीकडे कोरोनाचं संकट अधिक गडद होत आहे. अनेक ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आपल्या घरी परत जात आहेत. श्रेयस अय्यरनंतर आता स्टार गोलंदाज टी नटराजनवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या गुडघ्यावर आज यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो IPLमधून बाहेर गेला होता.

टी नटराजने आपल्या शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत डॉक्टर, चाहते आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत. ज्यांनी त्याला सहकार्य केलं आणि या सगळ्यात तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना ज्या ज्या लोकांनी केली त्याचे टी नटराजननं मनापासून आभार मानले आहेत.

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्य़ा नटराजनच्या गुडघ्याचे दुखणे वाढले होते. त्यावर लवकर शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे तो पुढे सामने खेळण्यासाठी अनफिट असल्याची माहिती 17 एप्रिल रोजी व्ही व्ही एस लक्ष्मण यांनी दिली होती. त्यानंतर आज त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

नटराजनवर शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. आता अजून कितीदिवस तो मैदानापासून दूर राहणार याबाबत अद्याप तरी माहिती मिळू शकली नाही. या आधी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. श्रेयस अय्यर अजून दोन ते तीन महिने मैदानापासून दूर राहणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें