Search
Close this search box.

रेमेडीसीवीरचं उत्पादन दुप्पट करणार, सरकारची योजना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रेमडेसीवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची योजना आखण्यात आली आहे. रेमडेसीविर इंजेक्शनचे उत्पादन वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचं ट्विट रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी केलंय़. या निर्णयामुळे रेमडेसीवर इंजेक्शनची संख्या वाढणार आहे.

राज्यासह देशभरात रेमडीसीवीर इंजेक्शनची मागणी वाढते आहे. या पार्श्वभुमीवर इंजेक्शनची निर्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दरम्यान रेमडेसीवीरचं उत्पादन येत्या 15 दिवसांत दुप्पट होणार आहे. म्हणजे दररोज 3 लाखांपर्यंत नेण्याची सरकारची योजना आहे. सध्या हे उत्पादन दिड लाख इतकं तयार होतंय असे मनसुख मंडाविया म्हणाले.

किंमतीत कपात
देशातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतेय. यासंदर्भात केंद्राने एक मोठा निर्णय घेतला असून रेमडीसीवीर इंजेक्शनच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा करण्यात आलीय. कंपन्यांनी या किंमतीत 70 टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. यापूर्वी वाढती मागणी लक्षात घेता रेमेडीसीवीर औषधाचे उत्पादन वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतलाय.

रेमेडीसीवीर औषध हे Gilead Sciences ने इबोला विषाणूचा उपचार म्हणून विकसित केले होते. परंतु आता त्याचा उपयोग कोरोनाच्या उपचारासाठी केला जातोय. संशोधन अहवालात असं म्हटलंय की, कोरोना विषाणूची बनवणाऱ्या एंजाइमला हे ब्लॉक करते.

केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा म्हणाले की, रेमेडसवीरचे उत्पादन वाढविण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहे. गेल्या पाच दिवसांत सहा लाख 69 हजार रेमेडीसीवर वेगवेगळ्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. रेमडेसीवीरचे उत्पादन 28 लाख शीशी प्रतिमहिना वाढवून 41 लाख प्रति महिना इतकी करण्यात आलीय असेही त्यांनी सांगितले.

admin
Author: admin

और पढ़ें