Search
Close this search box.

कुंभमेळ्यातून आलेले भाविक आता प्रसाद म्हणून ‘कोरोना’ वाटतील – किशोरी पेडणेकर

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राज्यातच नाही तर संपूर्ण देशात आणि जगात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असताना देखील हरिद्वार येथील कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी हजेरी लावली. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यातील काही भक्तांना कोरोनाची लागण झाल्याचं देखील कळत आहे. परिस्थिती लक्षात घेत मुंबईच्या महापैर किशोरी पेडणेकर यांनी म्हणाल्या, ‘कुंभमेळ्यातून आलेले भाविक आता प्रसाद म्हणून ‘कोरोना’ वाटतील.’

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, ‘दिल्लीत मुस्लीम बांधवांचा कार्यक्रम झाला. दिल्लीतून परतल्य़ानंतर 27 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. त्यानंतर कोरोना रूग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला. तशीच आजची परिस्थिती आहे. कुंभमेळ्यातून आलेले भाविक आता प्रसाद म्हणून ‘कोरोना’ वाटतील.’

भाविक परतल्यावर मोठा निर्णय
‘कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविकांनी राज्यात स्वखर्चाने क्वारंटाईन व्हावे. कोरोना वाढत आहे. त्यामुळे मुंबईत परतणाऱ्या भाविकांना देखील क्वारंटाईन करण्याचा विचार आम्ही करत आहोत.’ असं देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

24 तासात 1 लाख 99 हजार 620 लोक संक्रमित
गेल्या 24 तासात 1 लाख 99 हजार 620 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या काळात 1 हजार 37 लोक मरण पावले. त्यानंतर, भारतात कोरोनाची लागण होणारी संख्या 1 कोटी 40 लाख 70 हजार 300 पर्यंत गेली आहे आणि 1 लाख 73 हजार 152 लोकांचा मृत्यू झाला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें