देश

सलग दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात कडक संचारबंदीचा फज्जा

कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केलेत. मात्र, कोविड नियमांना हरताळ फासण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. (Coronavirus in Amaravati) असे असताना नागरिक बिनधास्त दिसत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी इतवारा परिसरात नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली आहे. (Coronavirus : Big crowd in the market in Amaravati )

राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत (Coronavirus in Maharashtra) असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध लागू करण्याते आदेश दिले आहेत. 30 एप्रिलपर्यंत राज्यात कडक निर्बंध लागू केले असून कलम 144 लागू केले आहे. मात्र अमरावतीतील इतवारा भागात या लॉकडाऊनचा पुरता फज्जा उडालेला आहे. नेहमीप्रमाणे येथील व्यावसायिकांनी आपले दुकानच थाटले होते. त्यामुळे अमरावतीतल्या एका भागाला वेगळा नियम आणि अमरावतीला इतवारा भागाला वेगळा का, असा सवाल उपस्थित होत आहे.

अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोना मृत्युंची संख्यादेखील वाढत आहे. असे असताना नागरिक कोविड नियम पाळताना दिसत नाहीत. अनेक ठिकाणी बेड मिळणेही कठिण झाले आहे. नागपूरमधील 150 कोरोना रुग्णांना अमरावतीत काल दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांना बेड मिळने कठिण होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. अशातच खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याने अधिक चिंता व्यक्त होत आहे.

अमरावती जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक कोविड नियम पाळताना दिसत नाहीत.

Related Articles

Back to top button