देश

Chandrakant Patil: मे महिन्यात ‘या’ तारखेनंतर राज्यातील सत्तेला सुरुंग; चंद्रकांत पाटील यांचा दावा

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होत असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे निकाल लागल्यानंतर राज्यातील सत्तेला नक्कीच सुरुंग लागेल, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केला. पाटील यांच्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही येथे प्रचारसभेत सत्ताबदलावर मोठे विधान केले होते. ( Chandrakant Patil On Maharashtra Government )

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या प्रचार चांगलाच तापला आहे. येथे भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असून आरोपप्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभांनी वातावरण ढवळून निघालं असताना आता भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रचारात उतरले आहेत. पाटील यांनी आज मंगळवेढ्यात गल्लोगल्ली जावून प्रचार केला. यावेळी माध्यमांशी बोलताना समाधान आवताडे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

Related Articles

Back to top button