देश

‘त्या’ वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना कोर्टाचा दिलासा

प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांनी पुत्र प्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिलासा मिळाला आहे. पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम 22 अंतर्गत संगमनेरच्या न्यायालात केस दाखल झाली होती. त्यावरील कोर्टाचे कामकाज पूर्ण झाले आहे. कोर्टाने इंदोकीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी कोर्टासमोर उपस्थित होण्यास सांगीतले होते. न्यायालयाने आज इंदोरीकरांच रिव्हीजन अपील मंजुर करत खालच्या कोर्टाची प्रोसेस इश्यु ऑर्डर रद्द केली आहे.

या विरोधात महाराजांनी आपल्या वकीलांमार्फत जिल्हा सत्र न्यायालयात स्थगीतीसाठी अर्ज केला होता. त्यावर न्यायलयाने सरकारी पक्ष, अंनिस आणि इंदोरीकरांची बाजू ऐकुन घेतली.

संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाने त्यांना समन्सही बजावलं होतं.

त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर २६ जून रोजी संगमनेर कोर्टात PCPNDT कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. इंदुरीकर यांच्या किर्तनाचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ इतर सोशल माध्यमांवरही चांगलाच गाजला होता. त्यावरून त्यांच्यावर अनेकांनी टीकाही केली होती.

Related Articles

Back to top button