देश
पुणेकरांसाठी खूशखबर; पाणीकपातीबाबत पालकमंत्र्यांच्या बैठकीत मोठा निर्णय
पुणे तेथे काय उणे? असे नेहमीच ऐकायला मिळते. त्याप्रमाणेच पुण्यात यंदा पाण्याची कमतरता नसणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा असल्यामुळे पाणीकपात होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात आता पाणीकपात केलं जाणार नाही. धरणांमध्ये पुरेसा जलसाठा असल्याने पाणी कपात न करण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांमधून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो.
नुकत्याच झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.