तुम्हाला देखील आयफोन खरेदी करण्याची इच्छा आहे. पण बजेट आणि फोनची किंमत यामुळं तुम्ही खरेदी करत नाहीयेत. लवकरच विविध ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल सुरू होणार आहेत. या सेलमध्ये तुम्हाला आयफोन 17 कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. अलीकडेच अॅपलने अनेक आयफोनच्या मॉडेलच्या किंमतीत वाढ केली आहे. यात आयफोन 17चादेखील समावेश आहे. पण येणाऱ्या फ्लिपकार्ट सेलदरम्यान तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत आयफोन खरेदी करण्याची संधी आहे.
Apple ने मागील डिसेंबरमध्ये iPhone 17 82,900 रुपयांत लाँच केला होता. त्यामुळं अनेक युजर्स आयफोन 17 स्वस्त होण्याची वाट पाहत होते. मात्र कंपनीने लाखो युजर्सचा अपेक्षाभंग केला. आयफोन 17 होण्याच्या ऐवजी त्याच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली. त्यामुळं आता आयफोन 99,900 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
Flipkart बिग बिलियन डेज सेल सर्वांसाठी 9 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. तर प्लस आणि ब्लॅक मेंबर्ससाठी 24 तास आधी अॅक्सेस मिळणार आहे. सेल सुरू होण्याच्या आधीच कंपनीने काही डिल्सबाबत खुलासा केला आहे. कंपनीने आयफोन 17च्या डिल्सबाबत खुलासा केला आहे. सेलमध्ये त्याची किंमत 79,999 रुपये सांगण्यात आली आहे. यात काही ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत.
फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या डिल्सवरुन आयफोन 17 खरेदी करण्याची ही योग्य वेळ असल्याचे लक्षात येतंय. यानंतर तुम्हाला हा फोन 99,900 रुपयांतच मिळणार आहे.
आयफोन 17 मध्ये युजर्सना 256 GB इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. तर, 6.3 इंचाचा LTPO Super Retina XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यात HDR 10, डॉल्बी व्हिजनचा सपोर्टदेखील मिळतो. तर स्क्रीन प्रोटेक्शनसाठी सेरेमिक शील्डचा वापर करण्यात आला आहे.
आयफोन 17 मध्ये Apple A 19 (3nm) चिपसेट देण्यात आलं आहे. यात Apple GPU चा वापर करण्यात आला असून स्टोरेजसाठी दोन पर्याय मिळतात. यात 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज आहे.








