Search
Close this search box.

Monsoon Update: मुंबईसह महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; हवामान विभागाची अधिकृत घोषणा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईसह राज्यातील काही भागातून मोसमी वारे अर्थात मान्सूनने माघार घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने याबाबतची घोषणा केली आहे. दरम्यान, पुढील 2 ते 3 दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनचा परतीचा प्रवास लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मोसमी वारे हे राज्यामधल्या काही भागांमधून माघारी गेलेले आहेत. मुंबईसह राज्यामधल्या काही भागांमधून मोसमी वारे हे सध्या माघारी फिरत आहेत. पुढचे दोन-तीन दिवसात संपूर्ण राज्यामधून मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल असं वातावरण तयार होतं आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने या संदर्भातली माहिती दिली आहे. शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी देखील चिंता निर्माण करणारी ही बातमी आहे. भारतीय हवामान विभागाकडून मोठी घोषणा केली आहे. राज्यातल्या काही भागातून मोसमी वारे माघारी परतले असल्याची घोषणा ही भारतीय हवामान केंद्राकडून करण्यात आलेली आहे आणि सोबतच पुढील दोन ते तीन दिवसात संपूर्ण राज्यातून हे मोसमी वारे माघारी परततील एकूणच परतीचा पाऊस हा कुठेतरी होईल, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Maharashtra Weather Update: मान्सून दोन दिवसांत 13 राज्यांतून घेणार निरोप

तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 48 तासांत 13 राज्यांमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल. दरम्यान, दक्षिणेत काही भागांत जोरदार, तर केरळमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 48 तासांत पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशातील उर्वरित भाग, गुजरात, मध्य प्रदेशातील बहुतांश भाग, संपूर्ण जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून परतण्याची परिस्थिती आहे.

Maharashtra Weather Update: यंदा 12.6 टक्के कमी पाऊस

जून ते सप्टेंबर या हंगामात देशात दीर्घकालीन सरासरीच्या 87.4 टक्के पाऊस झाला. सामान्यतः या काळात देशात 868.6 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र 759.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 2001 नंतरचा हा देशातील चौथा सर्वात कमी पावसाचा मान्सून हंगाम ठरला आहे. तर 1 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान देशात पावसाची 12.6 टक्के तूट नोंदवण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें