Search
Close this search box.

El Nino Impact : जगात उपासमारीची भीती; महागाईनं काळजाचा ठोका चुकवला, LPG नंतर आता अन्नधान्याच्या दरांचा रेकॉर्ड उच्चांक

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेचा फूड प्राइज इंडेक्स गेल्या काही महिन्यांपासून सतत वाढत आहे. जुलै 2026 मध्ये निर्देशांक 131.1 अंकावर पोहचला होता. गेल्या दोन महिन्यात या आकड्यात जवळपास 5 अंकांची वाढ नोंदवण्यात आली. सप्टेंबर महिन्यात निर्देशांक 136 वर पोहचला. मुख्य म्हणजे याच महिन्यात जगभरातील अन्नधान्याच्या किंमती चार वर्षांच्या उच्चांकावर होत्या.

अन्न-धान्याच्या आंतरराष्ट्रीय किंमतीत इतकी वाढ का?

  • अल् निनोमुळे उत्पादनावर परिणाम

अल् निनोसारख्या नैसर्गिक संकटामुळे जगभरातील बहुतेक भागांमध्ये उष्ण व कोरडे वातावरण आहे. या वातावरणाचा परिणाम साखर, गहू व इतर पिकांच्या उत्पादनावर होत आहे. येत्या काळात बदललेल्या हवामानामुळे या उत्पादनांवर परिणाम होण्याची भीती तयार झाली आहे. परिणामी या धान्यांच्या किंमती वाढल्या आहेत.

  • ब्लॅक सी व्यापरातील अडथळा

ब्लॅक सी म्हणजेच काळ्या समुद्रात युक्रेन-रशिया युद्धामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. व्यापारात अडथळा तयार झाल्याने वस्तूंच्या किंमती महागत आहेत. या मार्गातून गहु तसेच इतर पिकांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. वाहतूक अडथळ्यामुळे धान्याच्या पुरवठ्याबाबत समस्या निर्माण होत आहे. परिणामी किंमती वाढल्या आहेत.

  • अमेरिका-इराण युद्धामुळे कच्चे तेल महागले

गेल्या काही काळापासून अमेरिका-इराण या दोन्ही देशांत सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीमुळे Strait Of Hormuz तसेच इतर तेल वाहतूक मार्ग दबावाखाली आहेत. त्यामुळे तेलाच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. तेल महागल्यामुळे मालवाहतूक महागली आहे. याचा परिणाम वस्तूंच्या तसेच अन्न-धान्याच्या किंमतीवर होत आहे.

साखरेच्या किंमती 18 महिन्यांच्या उच्चांकावर

ऑगस्ट 2026 मध्ये भारतात सारखेच्या किंमतीने उच्चांक गाठला होता. साखरेच्या किंमती फक्त भारतातच नव्हे तर जागतिक बाजारपेठेतही महागल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात साखरेच्या आंतरराष्ट्रीय किंमती गेल्या 18 महिन्यांच्या उच्चांकावर होत्या. अल् निनोसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाजारात साखरेच्या उत्पादनाविषयी भीती तयार झाली आणि पुरवठ्याबाबत चिंता वाढली.

गव्हाच्या वायदे किंमती गेल्या तीन वर्षांच्या उच्चांकावर

काळ्या समुद्रावरील वाहतुकीच्या अडथळ्यामुळे गव्हाचा जागतिक पुरवठा दबावाखाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला गव्हाच्या वायदे किंमती तीन वर्षांच्या उच्चांकावर होत्या.

एकंदरीत रशिया-युक्रेन युद्ध, अमेरिका-इराण युद्ध तसेच अल् निनोसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अन्न-धान्याचे आंतरराष्ट्रीय किंमती महागल्या आहेत. FAO च्या फूड प्राइज इंडेक्समध्ये अन्न-धान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें