बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता दिनो मोरिया (Actor Dino Morea) याला मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अटक करण्यात आली आहे. मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी (Mithi River Irregularities Case) मुंबई पोलिसांनी दिनो मोरियाला मुंबईतील (Mumbai News) राहत्या घरातून अटक केली आहे. दरम्यान, दिनो मोरियावर (Dino Morea) यापूर्वी दिशा सालियान प्रकरणातही (Disha Salian Case) आरोप करण्यात आलेलं. दरम्यान, मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणात दिनो मोरियाला ईडी चौकशीलाही सामोरं जावं लागलेलं. तसेच, त्याच्या राहत्या घरी छापेमारीही करण्यात आलेली.
मिठी नदी गाळ उपसा गैरव्यवहार आणि अभिनेता डिनो मोरिया (Dino Morea) यांचं कनेक्शन मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सफाई कंत्राटातील कथित 65 कोटी रुपयांच्या आर्थिक अफरातफरीच्या तपासाशी संबंधित आहे. अटक करण्यात आल्यानंतर दिनो मोरिया याला अधिक चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून आज (2 ऑक्टोबर) सकाळपासून दिनो मोरिया याची चौकशी सुरू होती. सुमारे आठ तास चाललेल्या या चौकशीनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आलीय.
मिठी नदी गैरव्यवहाराचं प्रकरण नेमकं काय? (Mithi River Irregularities Case)
या घोटाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) गाळ काढण्याची यंत्रे आणि गाळ काढण्याची उपकरणे भाड्याने घेण्यामध्ये कथित आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप आहे. कोची येथील मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडून खरेदी केलेल्या मशिनरीसाठी कदम आणि सह-आरोपी जय जोशी यांनी महापालिकेकडून जास्त दर आकारल्याचा आरोप करण्यात आलाय. मॅटप्रॉप अधिकारी आणि बीएमसीच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (एसडब्ल्यूडी) विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे काम करण्यात आल्याचा तपासकर्त्यांचा अंदाज आहे.
मीठी नदी घोटाळा : बीएमसी, कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा
EOW नं BMC अधिकारी आणि कंत्राटदारांसह एकूण 13 जणांविरोधात मीठी नदी घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. ED चा संशय आहे की, विशेष ड्रेजिंग उपकरणं भाड्यानं घेण्यासाठी टेंडर प्रक्रियेत छेडछाड करण्यात आली, आणि ठराविक पुरवठादारांना फायदा मिळवून देण्यात आला. यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. मीठी नदी, जी मुंबईतून वाहून अरबी समुद्रात मिळते, ही नदी सतत गाळ आणि पुराच्या समस्यांमुळे त्रस्त आहे.
दिनो मोरिया कोण?
अक्षय कुमारच्या ‘हाउसफुल 5’ चित्रपटात काम करणारा अभिनेता दिनो मोरिया सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. डिनो मोरियाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्याचदरम्यान त्याला ‘प्यार में कभी कभी’ या सिनेमाची ऑफर मिळाली आणि त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. दिनो मोरियाचा पहिला सिनेमा तसा फारसा गाजला नाही. त्यानंतर तो थेट 2002 साली बिपाशा बासूसोबत ‘राज’ सिनेमात झळकला. या सिनेमानं रातोंरात त्या सुपरस्टार बनवलं. बिपाशा आणि दिनो केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडलेली, या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही बक्कळ कमाई केलेली. पण, त्यानंतर दिनो मोरियानं अभिनयातून काहीसा ब्रेक घेतला. बऱ्याच वर्षांनंतर कमबॅक करत, दिनो मोरिया 2021 मध्ये ‘द एम्पायर’ वेब सिरीजमध्ये झळकला. त्यानंतर दिनो अक्षय कुमारसोबत ‘हाउसफुल 5’मध्ये दिसलेला.








