Search
Close this search box.

भाजप आमदारांच्या शाळेचा अजब फतवा, पर्यूषण पर्वात डब्यात कांदा, लसूण आणण्यास मनाई

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या शाळेने अजब फतवा काढला आहे. विद्यार्थ्यांना डब्यात कांदा, लसूण आणण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर बटाटा, बीट आणू नये असंही शाळेच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण वर्ज्य करण्यात आलं आहे. शाळेने घेतलेल्या या अजब निर्णयाचा अनेकांनी विरोध दर्शवला आहे.

मीरा भाईंदर येथील एका शाळेत पर्युषणावरून गदारोळ माजला आहे. पर्युषणाच्या काळात विद्यार्थ्यांनी डब्यात कंदमुळे (जसे की कांदे, लसूण, बटाटे इत्यादी जमिनीखाली वाढणाऱ्या भाज्या) आणू नयेत, असे परिपत्रक शाळेने जारी केले आहे. या काळात शाळेच्या कॅन्टीनमध्ये यापैकी कोणत्याही पदार्थांपासून बनवलेल्या भाज्या दिल्या जाणार नाहीत.

ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता चालवतात, सेवेन स्वेअर ही शाळा आहे. दरम्यान या शाळेत पर्युषण काळात प्राणीहिंसा टाळण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांच्या डब्यात कंदमुळ पदार्थ आणू नयेत, अशी पालकांना विनंती करण्यात आली आहे. तसे परिपत्रक शाळेने वितरित केले आहे.

काही पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा मेसेज मनसेचे सचिन पोपळे यांना पाठवला. त्यानंतर मनसेने या आवाहनावर आक्षेप घेतला आहे. मराठी माणसांची मुलं आणि विद्यार्थी काय खाणार, हे ठरवणारे शाळा कोण, असा सवाल सचिन पोपळे यांनी उपस्थित केला आहे. मनसेने या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली आहे. नियमांनुसार, याबाबतचा कोणताही निर्णय केवळ पालक-शिक्षक संघटना (पीटीए) आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतरच घेतला जाऊ शकतो.

 

दरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शाळेतर्फे कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. पर्यूषण हा पवित्र काळ असून, या काळात पशू आणि प्राण्यांवर अन्याय होऊ नये, त्यांची कत्तल होऊ नये, या उद्देशाने पालकांना केवळ विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शाळेकडून व्हाट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात आलेल्या मेसेज मध्ये आम्ही विनंती केली आहे. कुठल्याही प्रकारची आम्ही सक्ती केलेली नाही. असे त्याने स्पष्ट केले. या प्रकरणात दुसरा कोणताही उद्देश नसून, यामध्ये राजकारण करू नये, असे आवाहनही नरेंद्र मेहता यांनी केले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें