Search
Close this search box.

‘मी तुझ्या वडिलांना मारलंय, आता तुझा नंबर,’ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दीकींना धमकी; गँगस्टरने पाठवली व्हॉइस नोट

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगज नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचं वृत्त आहे. परदेशातू कारवाया करणारा गँगस्टर झिशान अख्तर याने ही धमकी दिल्याचं समजत आहे. झिशान अख्तर याने सोशल मीडियावर ‘व्हॉइस नोट’त्या माध्यमातून ही धमकी दिल्याची माहिती आहे. अख्तर हा बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आणि आरोपी असून, मुंबई गुन्हे शाखा व इतर तपास यंत्रणांच्या वॉण्टेडच्या यादीत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हॉइस नोटमध्ये, गँगस्टरने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे आणि झिशान सिद्दीकी यांना धमकी दिली आहे. या व्हॉइस नोटमध्ये त्याने म्हटलं आहे की, “मी तुझ्या वडिलांना मारलं आणि आता तुझी पाळी आहे. तू माझ्या सर्व कामांमध्ये हस्तक्षेप करत आहेस. तुला जमेल तितकं गुन्हे शाखेकडे जा…मी तुझ्या विरोधात फतवा काढला आहे. तुझी सुरक्षा वाढव”.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिशान सिद्दीकी किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने कथित धमकीबाबत कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. झिशान सिद्दीकी सध्या भारताबाहेर आहेत. व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळण्यासाठी आणि ती कुठून आली याचा शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला आहे. तसेच, झिशान सिद्दीकी भारतात परतल्यावर त्यांचा जबाब नोंदवला जाईल, असेही पोलीस सूत्रांनी सांगितले.

admin
Author: admin

और पढ़ें