नाशिकमध्ये कालपासून पावसाची संततधार सुरूच आहे. मुसळधार पावसामुळं गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंड परिसरात पाण्याची पातळीदेखील वाढतेय. त्यामुळं रामकुंड परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी आले आहे. तर गोदाघाट परिसरातील लहान मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. घाट परिसरातील टपऱ्या, दुकानं काढून टाकण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्याला हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात दोन तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील दोन तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दोन तासांत जोरदार पाऊस बरसणार असून नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने 7 ते 10 या तीन तासासाठी अलर्ट दिला आहे.
गंगापूर धरणाचा विसर्ग वाढवला!
नाशिक जिल्ह्यातील संततधार पावसामुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणातून 199 क्युसेक पाण्याचा विसर्ग; पाऊस वाढल्यास टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविणार आहे. दारणा धरणातून 1,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून गंगापूर, दारणासह कडवा, भावली, पालखेड आणि नांदूर मधमेश्वर धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे.
गोदावरी व दारणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण धरणसाठा 58 टक्क्यांवर असून मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यातील धरणसाठा 80 टक्के होता.
गेल्या 24 तासांत नाशिक शहरात तब्बल 100 मिमी पावसाची नोंद
गेल्या 24 तासांत नाशिक शहरात तब्बल 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. इगतपुरी तालुक्यात पावसाचा सर्वाधिक जोर आहे. नाशिक शहराची तहान भागवणारे गंगापूर धरण 90 टक्क्यांवर, तर दारणा धरण 85% भरले; जिल्ह्यातील एकूण धरणसाठा 69 टक्क्यांवर पोहोचले आहे.
गंगापूर आणि दारणा धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू असून गोदावरी व दारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच असून पावसाची तीव्रता पाहून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहेय
गंगापूर धरणातून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढ
सकाळी 8 वा. : 3,165 क्यूसेक
सकाळी 9.30 वा. : 4,256 क्यूसेक
सकाळी 10.30 वा. : 5,295 क्यूसेक








