Search
Close this search box.

Artemis-2 : नासाने रचला इतिहास! आर्टेमिस II द्वारे चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून 4 अंतराळवीर पृथ्वीवर, प्रशांत महासागरात ‘फायरिंग लँडिंग’ करताना

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

आर्टेमिस 2 ने आज 10 दिवसांनंतर आपली चंद्र मोहीम पूर्ण करून प्रशांत महासागरात यशस्वीपणे लँडिंग केलंय. या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडीओ नासाने शेअर केला आहे. या यशस्वी मोहीमुळे नासाने आज इतिहास रचला आहे. आज भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5:37 ही वेळ चंद्रावर गेले चार अंतराळवीर सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. एवंढच नाही तर या चार अंतराळवीरांनी चंद्राभोवती प्रदक्षिणा घालून अंतराळात सर्वाधिक अंतर कापण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. या अंतराळवीरांनी जेव्हा प्रशांत महासागरात ओरियन कॅप्सूलचे मोठं पॅराशूट उघडलं तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या ऐतिहासिक क्षणाकडे होतं.

नासाने सांगितलं की, जेव्हा ओरियन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात शिरली, तेव्हा तिचा वेग ताशी 38,000 किलोमीटरपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे. तर हवेच्या घर्षणामुळे कॅप्सूलच्या बाहेरील तापमान हे 2800 अंश सेल्सिअसपर्यंत होतं. त्यामुळे हे चित्र एखाद्या जळणाऱ्या उल्केसारखं दिसत होतं.  या चार अंतरळवीरांना सुरक्षित लँडिंग करण्यासाठी नासाने कंबर कसली होती. त्यांनी ठरलेल्या ठिकाणी महासागरात कॅप्सूलचा वेग कमी करण्यासाठी अवकाशयानाचे तीन मोठं नारंगी आणि पांढरे पॅराशूट उघडले होते. ज्यामुळे कॅप्सूलचा वेग कमी होण्यास मदत मिळाली. तसंच या क्षणी अमेरिकन नौदलाची जहाजे आधीच सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले होते.

जसं हे कॅप्सूल महासागरात उतले तसंच नौदलाच्या पाणबुड्यांनी त्यांना वेढा घातला आणि सर्वत्र एकच जल्लोष पाहिला मिळाला. या कॅप्सूलमधून रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन चार अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आलं.

तिकडे नासाच्या सेंटरमधून हा क्षण पाहत असताना स्क्रीनवर ओरियन तरंगताना दिसताच शेकडो शास्त्रज्ञ आपल्या जागेवरून उडी मारून आपला आनंद व्यक्त केला. तर काहींच्या डोळ्यात आनंदाश्रूही होते. नासाचे प्रशासक या ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलताना म्हणाले की, “आज आम्ही हे सिद्ध केलंय की मानव पुन्हा चंद्रावर पाऊल ठेवण्यास आणि तिथे राहण्यास तयार आहे.”

आर्टेमिस-2 मोहिमेमुळे,54 वर्षांनंतर नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. तर 1972 मधील अपोलो 17 नंतर प्रथमच मानव चंद्राच्या इतक्या जवळून परत सुखरुप पृथ्वीवर आला आहे. विशेष म्हणजे या मोहिमेदरम्यान, क्रिस्टीना कोच यांनी ‘चंद्राच्या सर्वात जवळून उड्डाण करणारी पहिली महिला’ म्हणून विक्रम केला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें