नाशिकमध्ये महिला अत्याचाराचं बिंग फुटलं आणि अशोक खरात नावाच्या भोंदूबाबाचे एक एक कारनामे दर दिवशी नव्यानं समोर येऊ लागले. महिला, तरुणी आणि लहान मुलींवर पुजाविधीच्या नावानं अत्याचार करणाऱ्या खरातनं अनेक व्यावसायिकांनाही गंडा घातला. फसल्या मार्गानं पैसे उकळले. या आणि अशा अनेक गुन्ह्यांमध्ये कायद्याच्या कचाट्याच सापडलेल्या अशोक खरातसंदर्भात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
एचआयव्ही चाचणीचा अहवाल
एकिकडे खरातनं केलेल्या सर्व कृती चुकीच्या असल्या तरीही त्यानं अद्याप त्या मान्य केल्या नसून आपली कृत्य ही पुजेचाच भाग असल्याचं म्हणत त्यानं इतरांवरच आरोप केले. तर दुसरीकडे त्याच्या एचआयव्ही टेस्टची मागणी विधीमंडळात करण्यात आली होती. त्याच धर्तीवर एसआयटीनं खबरदारी घेत वैद्यकिय चाचणीचा भाग म्हणून नाशिक पोलिसांनी त्याची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली. महिलांवर अत्याचार करणाऱ्या या खरातच्या एचआयव्ही टेस्टचा रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती आहे. या रिपोर्टमुळं अनेकांचाच जीव भांड्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
खरात आता ईडी, फॉरेस्टच्याही रडारवर
भोंदू अशोक खरात आता ईडीसह फॉरेक्स विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. ज्यामुळं आता त्याच्या सर्व विदेश दौऱ्यांची आणि विदेशी चलन व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. तुर्कीहून आणलेल्या फर्निचरची कस्टम ड्युटी भरली की नाही याची देखील चौकशी होणार असल्यामुळं येत्या काळात अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढवण्याची शक्यता आहे. कस्तुरी शोधायला जातो, पुजेसाठी जातो असं खरातनं त्याच्याकडे येणाऱ्यांना भासवलं होतं. ज्यामुळं आता त्याच्या या सर्वच कृत्यांची उलट तपासणी होण्यास सुरुवात झाल्यानं सगळंच खरंखोटं समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
खरात प्रकरणी आणखी अश्लील व्हिडीओ व्हायरल
भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून, खरात प्रकरणात 8 अश्लील व्हिडिओ पोस्ट केल्याचं उघड झालं आहे. सातपूरच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आले. ज्याप्रकरणी नाशिक सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये 6 जणांसह ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच अटकेची शक्यता.









