अजित पवारांचा मृत्यू हा अपघात की घातपात हा तपासाचा हेतू असल्याचं सीआयडीनं पत्रकार परिषदेत सांगितलं. भरपूर पुरावे गोळा केले असल्याचं सीआयडीनं सांगितलं. सर्व माहिती घेऊन निष्कर्ष काढणार आहोत, तसंच घातपात आढळल्यास गुन्हा दाखल करणार असल्याचं सीआयडीनं सांगितलं. विमान अपघाताचा तपास योग्य दिशेनं सुरु असून, योग्य कलमाखाली गुन्हे दाखल करणार असल्याचं सीआयडीनं स्पष्ट केलं.
पोलिसांशी चर्चेनंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान ते म्हणाले ‘न्याय मिळाला नाही तर लोकं लढा देतील, आमचा तपासावर आक्षेप नाही मात्र FIR का घेतली जात नाही हा मुद्दा आहे. मुंबईनंतर आता बारामतीतही तेच झालं म्हणून आता पुण्यातील CIDच्या हेडऑफीसलाच जाणार’








