Search
Close this search box.

संशयास्पद इंजेक्शन आणि बरंच काही! गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मानवी तस्करीचे खळबळजनक प्रकार आजवर अनेकदा उघडकीस आले आहेत. दर दिवशी गुन्हेगारीचं एक नवं कृत्य विचार करायचा भाग पाडत असताना आणि डोक्याचा झिणझिण्या आत असतानाच आता आणखी एका प्रकरणानं नागरिकांसह पोलीस यंत्रणेलाही धक्का दिला आहे. कारण ठरतंय ते म्हणजे बदलापूर इथं सुरू असणारं अंडाशयाच्या तस्करीचं रॅकेट.

कुठे सुरू होतं हे रॅकेट? 

बदलापूरमध्ये गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयांची तस्करी केली जात असल्याचा भयंकर प्रकार नुकताच समोर आला आहे. याबाबत माहिती मिळताच बदलापूर पोलिसांनी दलालांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. त्यांच्या रॅकेटला आणखी किती महिला बळी पडल्या आहेत याचा पोलिसांनी कसून शोध सुरू केला आहे.

कसा उघडकीस आला हा प्रकार?

बदलापूरमधील एका पीडित महिलेनं उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी बदलापूर पूर्व आणि पश्चिम या दोन्ही पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवल्यानंतर ज्युवेली गावात राहणाऱ्या सुलक्षणा गाडेकर आणि तिची उल्हासनगरातील साथीदार अश्विनी चाबुकस्वार, मंजुषा वानखेडे अशा तिघांनाही पोलिसांनी अटक केली.

अटक करण्यात आलेल्या या सर्वांना 25 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बदलापूरच्या ज्युवेली गावातील नॅनो सिटी इथं सुलक्षणा गाडेकर ही महिला राहत असून, तिने गर्भाशयात स्त्री बीजाची वाढ होण्यासाठी लागणारे इंजेक्शन्स घरातच साठवले होते. गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवून ती हे इंजेक्शन देत होती. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदेशीरपणे सोनोग्राफी देखील करवून घ्यायची. गर्भाशयात स्त्री बिजाची वाढ झाल्यानंतर अशा महिलांना गाडेकर ही आयव्हीएफ सेंटरमध्ये पाठवायची. तिथं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन गर्भाशयातील अंडाशय काढलं जायचं.

महिलांच्या शरीरातून काढण्यात आलेल्या या अंडाशयाची त्यानंतर सर्रासपणे विक्री करण्यात येत होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सुलक्षणा गाडेकर हिच्यासह तिचे साथीदार अश्विनी चाबूकस्वार, मंजुषा वानखेडे यांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी गाडेकरच्या घरी धाड टाकून गर्भाशयासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनचे फोटो, सोनोग्राफीचे फोटो, खोटी प्रतिज्ञापत्रं, महिलांचे फोटो आणि इतर संशयास्पद कागदपत्रे जप्त केली असून आता या तस्करीमध्ये नेमकं आणखी कोण सामील आहे याचाच शोध घेतला जात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें