Search
Close this search box.

मनसेचे शिवसेनेला सहकार्य, राज ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांना आश्वासन! महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच मुंबई मोठी राजकीय घडामोड घडली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली.  मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिका निवडणुकांत ठाकरे बंधूंच्या युतीची झालेली पिछेहाटच्या पार्श्वभूमीवर भेट अत्यंत महत्वाती मानली जात आहे.  राज ठाकरे  आणि  एकनाथ शिंदे भेटीनंतर भविष्यात काही वेगळी राजकीय समीकरणे बांधली जाणार का? चर्चांना उधाण आले आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात बदललेल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झल्याची शक्यता वर्तवली जात आहे.  खासकरून मुंबई महापालिकेत काही समीकरणे बदलणार का याकडे लक्ष लागले आहे.  राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन निवासस्थानी येऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली.

 

राज ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांना आश्वासन! 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  आणि मनसे प्रमुख राज ठाकरे भेटीत काय घडलं जाणून घेऊया.   कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले.

ठाण्यातील मनसे नेत्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांनी राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली. या भेटी दरम्यान स्वीकृत नगरसेवकांसह निवडणुकीदरम्यान पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर चर्चा अपेक्षित आहे.  तसंच येणा-या काळात पक्षबांधणी आणि संघटन मजबुतीचा आढावा घेतला जाणार आहे. मीरा रोड, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील प्रमुख पदाधिकारी देखील राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचलेत.

भाजप नेते प्रसाद लाड  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा भेटीला 

भाजप नेते प्रसाद लाड मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.  प्रसाद लाड यांचे चिरंजीव शुभम यांच्या लग्नाची पत्रीका घेऊन राज ठाकरेंचा भेटीला पोहचले.
लग्नाला अमत्रण देण्यासाठी प्रसाद लाड यांनी भेट घेतली.

admin
Author: admin

और पढ़ें