Search
Close this search box.

Sahil Dhaneshra : रील शूट करताना धडक, 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अल्पवयीन आरोपी दहावीच्या परीक्षेसाठी जामिनावर, हतबल आई रडत म्हणाली…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

रील शूट करण्याच्या नादात अल्पवयीन तरुणाने गाडीचा स्पीड वाढवल्यामुळे माझ्या लेकाचा बळी गेला, अशा शब्दात मयत तरुणाच्या आईने आक्रोश केला. १७ वर्षीय मुलाने स्कॉर्पिओ कारची धडक दिल्यामुळे दिल्लीतील द्वारका येथील रहिवासी असलेला २३ वर्षीय बाईकस्वार साहिल धनेश्रा याचा ३ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.

अपघातानंतर पकडण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. त्याला बाल न्याय मंडळाने निरीक्षण गृहात पाठवले. मात्र नंतर त्याला दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसण्यासाठी अंतरिम जामीन मिळाला, असेही मयत साहिलच्या आईने एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. साहिलची आई इना माकन या एकल माता आहेत. घटनेच्या वेळी अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांची स्कॉर्पिओ नेली होती, तर त्याची बहीण रील शूट करत होती.

साहिलची आई काय म्हणाली?

“स्कॉर्पिओ ज्या वेगाने चालवली जात होती, ते रिल्समध्ये स्पष्टपणे दिसत आहे. तो चुकीच्या लेनमध्ये गाडी चालवत होता, तो सरळ बससमोर आला. तो आणि त्याची बहीण रिल्स बनवत असताना स्टंट केला” असा दावाही साहिलच्या आईने केला.

कसा झाला अपघात?

रील्स रेकॉर्डिंगवर लक्ष असताना त्यांची कार साहिलच्या बाईकला द्वारका भागात समोरासमोर आदळली आणि नंतर रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारला धडकली, असेही तिने पुढे सांगितले. टक्कर झाल्यानंतरही चालकाने ब्रेक लावला नाही. धडकेमुळे बस आणि पार्क केलेल्या कारचे मोठे नुकसान झाले आणि जवळच विश्रांती घेत असलेल्या टॅक्सी चालकाला गंभीर दुखापत झाली.

“आम्हाला एफआयआरमध्ये सांगण्यात आले होते की आरोपी १९ वर्षांचा आहे. हा अपघात किंवा चूक नाही, तर हे गुन्हेगारी कृत्य आहे” असे साहिलची आई म्हणाली. किशोरवयीन मुलाला यापूर्वी वेगाने गाडी चालवल्याबद्दल चालान लागू करण्यात आले होते, पण त्याचे पालक त्याला रोखण्यात अयशस्वी ठरले होते.

“काही मुलांना वाटते की त्यांचे पालक श्रीमंत आहेत म्हणून ते काहीही करु शकतात आणि त्यांना शिक्षा होणार नाही. जर तरुण विद्यार्थीच रस्त्यावर सुरक्षित नसतील तर मग कोण आहे?” असा सवालही त्यांनी विचारला.

पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१ (रॅश ड्रायव्हिंग), १०६(१) (निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरणे) आणि १२५(अ) (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे कृत्य) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

admin
Author: admin

और पढ़ें