Search
Close this search box.

शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांवर गोळीबार; 34 जण ठार, 22 मुलांचा समावेश, थायलंडमधील घटनेने जग हादरलं

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

थायलंडमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. आतापर्यंतच्या सर्वात भीषण गोळीबारात 22 मुलांसह 34 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अनेक लोकांना ओलीस ठेवण्यात आलं आहे. दक्षिण थायलंडच्या सोंगखला येथील एका शाळेत एका हल्लेखोराने अज्ञात विद्यार्थी आणि शिक्षकांना ओलीस ठेवलं होतं, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने सोशल मीडियावरुन दिली आहे.

घटनेची माहिती मिळताच, शेकडो तरुण बाहेरील रस्त्यांवर पळून जाताना दिसले होते. तसंच सशस्त्र पोलीस घटनास्थळी पोहोचले. इमारतीत अजूनही अनेक शिक्षक आणि विद्यार्थी अडकले आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें