Search
Close this search box.

ZP and Panchayat Samiti Elections Voting 2026 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, बारामतीत पवार कुटुंबीयांकडूम मतदान

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान केलं. आई हिराबाई पडळकर आणि कार्यकर्त्यांसमवेत मतदान केंद्रावर जात पडळकर यांनी आपलं मतदान केलं. यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेने पंचायत समितीसाठी मोठ्या संख्येने मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदानाला सुरुवात झाली मतदान केंद्रावर सकाळी सकाळीच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यात ज्या तेर जिल्हा परिषद गटाची चर्चा झाली त्या तेरच्या मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसत आहे. सकाळी सकाळीच मतदानासाठी उमेदवार आणि मतदार बाहेर पडले आहेत. मतदान केंद्रावर मतदानासाठी महिलांची गर्दी पाहायला मिळतेय.

खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 सखी मतदार केंद्र स्थापन केली आहेत. या मतदानकेंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच महिला आहेत. मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मकसह भाग वाढावा याअनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यात आठ सखी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

admin
Author: admin

और पढ़ें