Search
Close this search box.

Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम; बोरघाटात अनेक वाहन बंद पडल्याने पूर्ण वाहतूक ठप्प, सध्या परिस्थिती काय?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway Traffic) टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. तब्बल 32 तास लोक या वाहतुक कोंडीत अडकलेली होती. यानंतर मोठा हाहाकार माजला होता. पुणे मुंबई दृतगती महामार्गावरती टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. तब्बल 32 तास लोक या वाहतुक कोंडीत अडकलेली होती. यानंतर मोठा हाहाकार माजला होता. त्यानंतर हा टँकर हटवल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र 24 तासानंतरही पुणे-मुंबई  एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम पाहायला मिळते. अनेक वाहन बोरघाटात बंद पडलेली आहेत. घाटामध्ये आता पुन्हा गाड्या बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत त्या गाड्या हटवल्या जाणार नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूककोंडीची (Mumbai Pune Expressway Traffic) दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली आहे. भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गंभीर दखल घेतली आहे. आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिली आहे. सोबतच मिसिंग लिंकचे कामही लवकर पूर्ण करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक 32 तास ठप्प, राज ठाकरेंचा सरकारला सवाल- (Raj Thackeray On Mumbai Pune Expressway)

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास 32 तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. आणि यानंतर नेहमीप्रमाणे सरकारकडून या प्रकरणाच्या फक्त चौकशीचे आदेश दिले गेले. या आणि अशा अनेक घटनांच्या अनेक चौकशा होतात. पुढे त्यातून काही बोध सरकार, प्रसाशन घेतं का?  हा प्रश्न आहे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. तसेच 3 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 च्या आसपास गॅसचा टँकर उलटला. त्यानंतर सुरक्षेचा पर्याय म्हणून वाहतूक थांबवली गेली, हे पण योग्य झालं. पण अशा घटना घडल्या तर काय काय उपाययोजना करून कमीत कमी वेळेत रस्ता मोकळा करता येईल याचा कृती आराखडा प्रशासनाकडे तयार होता का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. (Raj Thackeray On Mumbai Pune Expressway)

admin
Author: admin

और पढ़ें