Search
Close this search box.

Budget 2026 Streaming: 1 फेब्रुवारीला सादर होणार बजेट; अर्थसंकल्पाच थेट Live प्रक्षेपण कुठे आणि कसे पाहायचं? जाणून घ्या

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

देशाचा बहुप्रतिक्षित केंद्रीय अर्थसंकल्प 2026 येत्या 1 फेब्रुवारी, रविवारी सादर केला जाणार आहे. अनेक अर्थांनी हा अर्थसंकल्प ऐतिहासिक ठरणार आहे.  हा मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असून निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman Budget 2026 Speech Streaming:) यांचा सलग नववा अर्थसंकल्प असणार आहे. यासोबतच भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता संसदेत आपला अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात करतील. हा अर्थसंकल्प सामान्य जनतेसाठीही तेवढाच महत्त्वाचा असतो. याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चं  थेट लाईव्ह प्रक्षेपण कुठे आणि कसे पाहायचं याबाबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊयात…

देशाच्या अर्थकारणाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प

2026-27 या आर्थिक वर्षासाठी सादर होणारा हा अर्थसंकल्प सरकारच्या आर्थिक धोरणांची दिशा ठरवणार आहे. शेतकरी, मध्यमवर्ग, नोकरदार, उद्योगजगत आणि स्टार्टअप्ससह विविध क्षेत्रांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष अर्थमंत्र्यांच्या भाषणाकडे लागले आहे.

बजेट भाषण थेट कुठे पाहता येईल?

जर तुम्हालाही केंद्रीय अर्थसंकल्प 2026 चे भाषण लाईव्ह पाहायचे आणि ऐकायचे असेल, तर त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

संसद टीव्ही (Sansad TV) वर बजेटचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.

दूरदर्शन (DD National / DD News) वरही लाईव्ह कव्हरेज असेल.

भारत सरकारच्या अधिकृत YouTube चॅनलवर बजेटचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल.

याशिवाय Zee 24 Taas च्या  डिजिटल प्लॅटफॉर्म आणि Zee 24 Taas च्या टीव्ही चॅनल्सवर बजेटविषयक विशेष कार्यक्रम, विश्लेषण आणि लाईव्ह अपडेट्स पाहता येतील

बजेट सादरीकरणानंतर विविध क्षेत्रांवरील परिणाम, करसवलती, योजनांमधील बदल आणि महत्त्वाच्या घोषणा यांची सविस्तर माहितीही डिजिटल माध्यमांवर उपलब्ध होणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें