Search
Close this search box.

Akola Crime : आपला राजा राणीचा संसार असणार! प्रेमाच्या आणाभाका, मर्यादा ओलांडल्या अन् तरूणी ५ महिन्यांची गर्भवती त्यानंतर… अकोल्यात खळबळ

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं शारीरिक शोषण केल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. प्रेमाच्या आणाभाका घेत तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं. लग्नासाठी होकार द्यायचा आणि शारिरीक शोषण करणारे नराधम समाजात फिरत आहेत. अशीच घटना अकोल्यातील मूर्तिजापूर मध्ये उघडकीस आली आहे. तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव मयूर गोकुळ जाधव असून वय वर्ष 22 रा. भटोरी नाका मूर्तीजापुर येथील आहे.

अकोल्याच्या मूर्तिजापूर येथे एका तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले. तरुणाने तिच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिषही दाखवले. यानंतर दोघांनी आपल्या नात्याची मर्यादा ओलांडली. पण नंतर जे समोर आलं त्याने तरुणीला धक्काच बसला. तरुणी पाच महिन्याची गर्भवती राहिली होती, नराधम तरुणासोबत एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यातून ती पाच महिन्याची गर्भवती राहिली.

तरुणीने लग्नबाबत मयूरला विचारणा केल्यावर त्याने लग्नास नकार दिला. लग्नाचे आमिष दिल्याने मर्यादा ओलांडली गेली, मात्र लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने पोलिसात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून मयूर जाधवला अटक केली आहे. मूर्तिजापूर येथे मयूर जाधव खासगी काम करतो, मयुरची ओळख तरुणी सोबत झाली, ओळखीतून भेटीगाठी वाढल्या आणि ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यातूनच लग्नाच्या आणाभाका मयूरने तरुणीचे शारीरिक शोषण केले. आणि तरुणी गर्भवती राहिली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मयूर जाधव या नराधमाला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 69 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली तर पुढील तपास अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार श्याम मडावी हे करीत आहे. प्रेमाच्या आणाभाका आणि तरुणीचे शारीरिक शोषण ह्या घटना सध्या समाजात वाढत चालल्या आहेत. यावर अंकुश लागणे गरजेचे आहे. तरुणींनी सुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे.

admin
Author: admin

और पढ़ें

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार