Search
Close this search box.

भारताच्या स्टार खेळाडूंना TTE ने ट्रेनमधून बाहेर काढलं, मुंबईत घडली धक्कादायक घटना, नेमकं काय झालं?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भारत सरकार एकीकडे खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मोठी पावलं उचलतेय, तर दुसरीकडे क्रिकेट शिवाय अन्य खेळांना लोकं अद्यापही सन्मान द्यायला तयार नाहीत. मुंबईच्या पनवेल रेल्वे स्थानकात अशी घटना घडली ज्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून राग व्यक्त केला जात आहे. भारताचे दोन टॉप पोल वॉल्ट खेळाडू देव मीणा आणि कुलदीप यादव या दोघांना पनवेल रेल्वे स्थानकात आलेल्या ट्रेनमधून जबरदस्ती बाहेर काढण्यात आले. त्यानंतर अनेक तास ते पनवेल रेल्वे स्थानकात अडकून पडले. एवढंच नाही तर लाखो रुपयांचं क्रीडा साहित्य ट्रेनमधून घेऊन जाण्यास टीटीईने आक्षेप घेतल्याने सदर घटना घडली आहे. याकारणाने वाद झाला आणि दोन्ही खेळाडूंना जबरदस्ती गाडीतून बाहेर काढण्यात आलं.

बंगळुरूवरून भोपाळला परतत होते खेळाडू : 

देव आणि कुलदीप हे दोघे भोपाळला परतत होते. बंगळुरूमध्ये ऑल इंडिया इंटर-यूनिवर्सिटी एथलेटिक्स चॅम्पियनशिप झाली होती, ज्यात या दोघांनी सहभाग घेतला होता. एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार ट्रेनमध्ये तिकीट चेक करण्यासाठी आलेय टीटीईने दोन्ही खेळाडूंना पोल वॉल्ट पोल्स ट्रेनमधून सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. पोल वॉल्टमध्ये सर्वात महत्वाचं उपकरण हे पोल असतं. जे जवळपास 5 मीटर लांब असतं, ज्याची किंमत 5 लाख रुपये असते. क्रिकेटमध्ये फलंदाजासाठी बॅट जितकी महत्त्वाची असते. तितकीच पोल व्हॉल्टरसाठी त्यांचा पोल हे एक महत्वाचं उपकरण असतं.

 

टीटीईने लगेज फाईन घेण्यास नकार दिला : 

दोन्ही खेळाडू ट्रेनमधून त्यांच्या खेळाचे उपकरण घेऊन प्रवास करत होते. यावेळी टीटीईने त्या दोघांच्या सामानाला ‘अनधिकृत लगेज’ म्हणून करार दिला आणि दोघांना पनवेल स्थानकात ट्रेनमधून जबरदस्ती खाली उतरण्यास सांगितले. दोन्ही खेळाडूंनी टीटीईकडे विनंती केली आणि त्यांना त्यांच्या वरिष्ठांशी बोलण्यास सांगितले. दोन्ही खेळाडूंनी टीटीईला अनधिकृत सामानावर फाईन लावा पण खाली उतरवू नका अशी विनंती केली, ते सामानावर दंड भरण्यास तयार होते. मात्र टीटीईने त्यांची ही मागणी फेटाळली आणि त्यांना पनवेल स्थानकात उतरण्यास सांगितले.

4 ते 5 तास रेल्वे स्थानकात वाट बघावी लागली : 

आंतरराष्ट्रीय पोल वॉल्ट खेळाडू देव मीना याने म्हटले की, ‘आम्हाला रेल्वे स्थानकात जवळपास 4 ते 5 तास वाट बघावी लागली. जर आमच्या सोबत असं झालं असेल तर जुनिअर खेळाडूंसोबत आम्ही कोणती अपेक्षा करणार? जर भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूसोबत अशा घटना अजूनही घडत असतील तर मी आणखी काय बोलू? सर्वांना अपेक्षा आहे की आपण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरू, पण आपण आपला खेळ येथे (स्टेशनवर) पूर्ण करत आहोत. आम्ही इथे बसलो आहोत आणि कोणीतरी येऊन आम्हाला मदत करेल याची वाट पाहत आहोत’.देव मीना हा नॅशनल रेकॉर्ड होल्डर खेळाडू आहे. त्याने 5.40 मीटर उंची पार करून हे यश मिळवले.

विमान प्रवासादरम्यान सुद्धा असं होतं : 

पोल वॉल्ट खेळाडू कुलदीप यादवने म्हटले की, ‘विमान प्रवासातही अशीच समस्या उद्भवते. अशा परिस्थितीत खेळाडूंनी जायचं कुठे? प्रवास करताना आपल्याला जागेची आवश्यकता असते. जर आम्हाला यासाठी पैसे द्यावे लागले तरी आम्ही तयार आहोत, परंतु आमच्या खेळाचे साधन व्यवस्थित ठेवण्याची सुविधा आम्हाला दिली पाहिजे’.

admin
Author: admin

और पढ़ें

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार

Ajit Pawar Baramati Plane Crash: भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन; राजकारणातील ‘दादा’ पर्वाचा बारामतीत करुण अंत; उद्या विद्या प्रतिष्ठानमध्ये दादांना अखेरचा निरोप, पीएम मोदी, अमित शाह उपस्थित राहणार