Search
Close this search box.

मतदान करुन अक्षय कुमार बाहेर आला अन् ‘त्या’ लहान मुलीने त्याचे पाय धरलं, म्हणाली ‘बाबांवर…’, काय म्हणाला खिलाडी?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महापालिका निवडणूक 2026 साठी महाराष्ट्रात 29 महानगरपालिकांसाठी मतदान सुरु आहे. सामान्य जनतेपासून राजकारणी आणि बॉलिवूड सेलिब्रिटी आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे. मुंबईत अक्षय कुमारनेही आपला मतदानाचा अधिकार बजावला. जेव्हा खिलाडी मतदान केंद्रातून मत करुन बाहेर आला तिथला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका लहान मुलीने अक्षय कुमारचे पाय धरले.

अक्षय कुमारचा व्हिडीओ व्हायरल 

खिलाडी जेव्हा मतदान करुन बाहेर आला आणि गाडीकडे जात असताना अचानक एक मुलगी त्याच्याकडे आली. ती मुलगी म्हणते की, बाबा खूप कर्जात आहेत. कृपया त्यांना मदत करा. अक्षयने मुलीला शांत केलं आणि त्याच्या मॅनेजरकडे बोट दाखवत म्हणाला, “कृपया तुझं नाव आणि नंबर लिहून दे. मी मदत करेन.”

त्यानंतर ती मुलगी अक्षय कुमारच्या पाया पडली पण अक्षय तिला असे करण्यापासून मनाई करतो. अक्षय म्हणतो, “बेटा, असं करू नकोस.” अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. चाहत्यांना अक्षयचा हावभाव खूप आवडतो. अक्षय त्याच्या दयाळू स्वभावासाठी ओळखला जातो आणि गरजूंना मदत करण्यासाठी नेहमीच तयार असतो.

दरम्यान मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने पत्रकाराशी संवाद साधला. तो म्हणाला की, सर्वांनी मतदान करायला यावं. आज बीएमसी निवडणूक आहे. मतदानाच्या दिवशी आपण रिमोट कंट्रोल हातात धरतो. मी सर्वांना बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन करतो. आपण अनेकदा तक्रार करतो, पण आज जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे. संवादात सहभागी होऊ नका; मतदान करा.”

अक्षय कुमारच्या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर वेलकम टू द जंगल, हेरा फेरी 3 आणि भूत बांगला यासारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 2025 मध्ये, अक्षय स्काय फोर्स, केसरी चॅप्टर 2, हाऊसफुल 5 आणि जॉली एलएलबी 3 सारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय.

admin
Author: admin

और पढ़ें