Search
Close this search box.

BMC Election : मोठी बातमी! ठाकरेंना धक्का देत DCM शिंदे दगडू सपकाळांच्या भेटीला; लालबाग- परळच्या राजकारणाला नवं वळण?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आलेली असतानाच सत्तानाट्यात नवे अंक जोडले जात असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे. ज्या मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, त्यात मराठी बहुल आणि मध्यमवर्गीची मोठी वस्ती असणाऱ्या, शहरातील गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबाग- परळ इथं येत्या काळात राजकीय समीकरणं बदलू शकतात असं चित्र दाखवणारे संकेत सध्या मिळत आहेत. निमित्त ठरतंय ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आमदार दगडू सकपाळ यांची भेट.

ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार आणि पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख दगडू सकपाळ यांची नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भेट झाली असून, या भेटीदरम्यान निलेश राणे यांचीही उपस्थिती असल्याची माहिती समोर आली आहे. सकपाळ यांच्या निवासस्थानी ही भेट पार पडली. ज्यानंतर आता लालबाग परळमधील राजकारणाला वेगळं वळण मिळणार का? हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें