बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ‘पाच दिवसांचा आठवडा’ बँकांसाठी लागू करावा, हे त्यांचे मुख्य मागण आहे. जर हा संप यशस्वी झाला, तर सलग पाच दिवस बँकांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे. आता तुम्ही विचार कराल जर संप तीन दिवसांचा आहे तर पाच दिवसांचा संप कसा होईल? त्याबद्दल आणि इतर माहिती जाणून घ्या. जानेवारी महिन्यात 25 तारखेला रविवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यानंतर लगेच 27 तारखेला संपाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तीन दिवसांचं संप असला तरी २६ जानेवारी आणि 26 जानेवारीच्या सुट्टी पकडून सलग पाच दिवस बँका बंद राहू शकतात. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि इतर वित्तीय कामांवर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कधी करणार संप?
25 जानेवारी रविवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुटी आहे. त्यानंतर 27 तारखेला संपाची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामुळे बँकांचे कामकाज सलग पाच दिवस बंद राहू शकते. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार, आणि इतर वित्तीय कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. हा संप झाल्यास मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास होऊ शकतो. व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे.
कोणत्या मागण्यांसाठी करणार संप?
बँक कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मग तरी अजून कोणत्या सुट्ट्या अपेक्षित आहेत असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडू शकतो. तर कर्मचारी संघटना उर्वरित दोन शनिवारीदेखील सुटी मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. म्हणजेच बँक कर्मचाऱ्यांना आठवड्याचे पाच दिवस काम आणि प्रत्येक शनिवार रविवार सुट्टी हवी आहे. मार्च 2024 मध्ये झालेल्या वेतन करारात ‘आयबीए’ आणि ‘यूएफबीयू’ यांच्यात या मागणीवर सहमती झाली होती. मात्र, सरकारकडून अद्याप या बाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही.









