नव्या वर्षात मुंबईत घडलेल्या एका गुन्ह्यानं यंत्रणांच्यासुद्धा भुवया उंचावल्या आहेत. जिथं शहरातील वाकोला पोलीस स्थानकात 25 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन मुलांची आई असणाऱ्या या महिलेवर प्रियकराच्या गुप्तांगांवर वार करण्याचा आरोप आहे. महिलेच्या आरोपांनुसार प्रियकरानं त्याच्या पत्नीचा त्याग करत या महिलेशी लग्न करण्यास नकार दिल्यानं संतापाच्या भरात तिनं हे पाऊल उचललं. नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचं निमित्त साधत तिनं सूड उगवण्यासाठी कट रचूनच प्रियकरावर जीवघेणा हल्ला केला.
प्रियकराला घरी बोलवलं आणि…
नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचं कारण देत या महिलेनं सांताक्रूझमधील आपल्या घरी या प्रियकराला बोलवलं आणि त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांच्या माहितीनुसार महिलेचा 42 वर्षीय प्रियकर हा तिच्या वहिनीचा भाऊ असून या दोघांमध्येही गेल्या 7 वर्षांपासून विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. आरोपी महिलेला दोन मुलं असून, त्यांचं वय 4 आणि 7 वर्षे आहे. तर, महिलेचा प्रियकरही विवाहित असून, त्यालाही मुलंबाळं आहे. तरीही त्यानं तिला लग्नाचं आश्वासन देऊन पुढं लग्नास नकार दिला.
पत्नी आणि मुलांना सोडण्यास नकार देताच…
पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी महिला पीडित पुरुषाशी लग्न करू इच्छित होती. मात्र त्यानं पत्नी आणि मुलांना सोडण्यास नकार दिला. जेव्हा त्याच्या पत्नीला या दोघांच्या नात्याची माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या वैवाहिक नात्यात वितुष्ट आलं. पीडित पुरुषानं पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलेनं परिस्थिती समजून घेण्यास नकार गिला. ज्यानंतर ती बिहारमध्ये तिच्या वडिलांच्या घरी गेली. मात्र 19 डिसेंबरला ती परतली, 24 डिसेंबरला प्रियकरानं तिला पुन्हा परिस्थिती समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. 1 जानेवारीला आरोपी महिलेनं त्याला नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचं निमित्त सांगत मिठाई खाण्यासाठी घरी बोलवलं.
प्रियकर महिलेच्या घरी आला, तिथं या दोघांमध्ये संबंध आले आणि तेव्हाच या महिलेनं एका धारदार वस्तूनं पुरुषाच्या गुप्तांगांवर वार केले. पीडित पुरुषाच्या माहितीनुसार यावेळी महिलेची मुलं दुसऱ्या खोलीत झोपली होती. अनपेक्षितपणे झालेल्या या भीषण हल्ल्यानंतर प्रचंड रक्तस्त्राव होऊ लागला आणि त्या पुरुषानं कसाबसा घटनास्थळाहून पळ काढला. त्यानं आपल्या मुलाला आणि भावाला झाल्या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर त्यांनी लगेचच त्याला व्ही एन देसाई रुग्णालयात नेलं. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी महिला बिहारमध्ये असतानाही प्रियकराला फोनवरून धमक्या देत होती. सध्या या विचित्र प्रकरणात महिलेविरोधात पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमान्वये जीवघेणी दुखापत आणि धमकी देण्याप्रकरणाचा गुन्हा नोंदवला आहे.









