Search
Close this search box.

लाडकी बहिण योजनेबाबत मोठी बातमी! ‘… तर 60 लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद?’

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

महाराष्ट्राच्या बहुचर्चित “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजने” च्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी दिलेली ई-केवायसी करण्याची मुदत  बुधवारी संपुष्टात येत आहे. आता केवायसीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे साठ लाख लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिना दीड हजार रुपये दिले जात होते. पण त्यापेक्षा अधिक उत्पत्र असणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद तसेच पोलीस खात्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सुमारे 2 कोटी 45लाख लाडक्या बहिणी या योजनेचा लाभघेत होत्या; पण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार आता असल्य होऊ लागल्याने लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी ई-केवायसी सक्तीचे केले.

31 डिसेंबरनंतर ई-केवायसीमध्ये कोणतेही बदल शक्य होणार नाहीत. सप्टेंबरमध्ये योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी 13 प्रमुख पॅरामीटर्स असलेली ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, योजनेअंतर्गत लाभ वितरण अधिक सोपे, पारदर्शक आणि पद्धतशीर होईल.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहेन योजनेअंतर्गत 2.3 कोटींहून अधिक लाभार्थी नोंदणीकृत आहेत. या योजनेअंतर्गत, 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. लाभार्थी महिला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांसाठी योजनेच्या हप्त्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें