संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती ठाकरे बंधूंच्या युतीची. कोणत्याही क्षणी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरे बंधूंच्या एका घोषणेमुळे एकनाथ शिंदे यांचे टेन्शन वाढले आहे. ठाकरे बंधू थेट एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात एकत्र लढणार आहेत. ठाण्यासह मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नवी मुंबई येथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहेत
ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र उतरणार आहेत. ठाकरे बंधूंच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये दोन आकडी नगरसेवक जिंकून येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ठाणे शहरात ठाकरे बंधूनी लक्ष केंद्रित केले आहे. तर, कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात देखील दोन जागा मनसे लढणार आहे. येत्या तीन अथवा दहा तारखेला ठाण्यातील महत्त्वपूर्ण अशा गडकरी रंगायतन येथील चौकात ठाकरे बंधूंची आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र सभा पार पडण्याची शक्यता सूत्रांची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदार संघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसे पक्षाचा वर्चस्व जास्त असल्याने मोठ्या ताकदीने ठाकरे बंधू कोपरी पाच पाखाडी मतदारसंघात उतरणार आहेत.
तर, दुसरीकडे ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना युती हवी असली तरी भाजपच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मात्र युती विरोधात सूर कायम ठेवल्याच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात कोपरी मधील भाजपच्या मंडळ अध्यक्ष्यांनी युती विरोधात पहिली ठिणगी टाकल्यानंतर कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही युती झाल्यास 50 टक्के जागांची मागणी केली आहे. अन्यथा स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, नगरपालिका निवडणुकीत शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारत बदलापूर, अंबरनाथवर कब्जा मिळवला. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत जिल्ह्यात भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. तसेच ठाण्यात पुन्हा शत-प्रतिशत भाजपचा नारा घुमू लागलाय…केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर रवींद्र चव्हाणांनी युतीची घोषणा केली असली तरी या निकालामुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच भाजप ठाणे महापालिकेत जास्तीत जास्त जागांसाठी आग्रही धरेल, वेळप्रसंगी भाजप स्वबळावरही लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाणे महानगरपालिका निवडणुकी मध्ये 33 प्रभागांमध्ये एकूण 131 नगरसेवक आहेत. ठाण्यातील टेंभी नाका आनंद आश्रम मध्ये शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेणं सुरू आहे. नगरसेवक पदासाठी 1165 इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे अर्ज घेतले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के ,माजी आमदार रवींद्र फाटक ,माजी महापौर मीनाक्षी शिंदे, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत पवार , ज्येष्ठ नगरसेवक हेमंत जगदाळे, विलास जोशी हे इच्छुकांची मुलाखाती घेणं सुरू आहे. शिवसेना-भाजप युतीमध्ये अजून देखील फॉर्मुला ठरला नाही.









