Search
Close this search box.

धक्कादायक! गोव्यात 25 जणांना मृत्यूच्या आगीत लोटणाऱ्या ‘त्या’ क्लबचे मालक IndiGo विमानानं फरार

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सहली आणि पर्यटनासाठी वर्षभर लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या गोव्यामध्ये नुकत्याच झालेल्या अग्निकांडानंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या क्लबचा मालक कोण, अशी चर्चा सुरू असतानाच त्याचं नाव समोर येण्याच्या काही तासांनंतर आणखी एक अनपेक्षित बाब समोर आली. ती म्हणजे आगीच्या घटनेनंतर काही तासांतच बर्च बाय रोमियो लेन (Birch by Romeo Lane) या नाईट क्लबचा मालक आणि मुख्य आरोपी सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा यांनी देशाबाहेर पळ काढला.

पोलीस यंत्रणांनी सौरभ आणि गौरव यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधमोहिम सुरू केली असून, तपासादरम्यान ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून मिळालेल्या माहितीमुळं पोलीस यंत्रणेला मोठा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार दोघांनी रविवारी, पहाटे फुकेतला पळ काढल्याचं उघड झालं. गोवा पोलीस सीबीआयच्या इंटरपोल विभागाशी समन्वय साधून लुथरा बंधूंचा शोध घेत असून, त्यांच्याविरोधात गोवा पोलिसांनी या दोघांविरुद्ध ‘लूकआउट नोटीस’ जारी केली. या नाईट क्लबमध्ये झालेल्या अग्निकांडप्रकरणी पोलिसांनी पाचव्या संशयिताला अटक केली. क्लबचा मॅनेजर करुणसिंग कोहली (वय 49, रा. पंजाब) अशी त्याची ओळख. मालकांच्या वतीने तो क्लबच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी सांभाळत होता.

कुठे आहे हा क्लब? 

पणजीपासून साधारण 25 किमी अंतरावर बर्च बाय रोमियो लेन (Birch by Romeo Lane) हा नाईट क्लब असून, 6 डिसेंबरला इथं लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये नाईट क्लबचे 20 कर्मचारी आणि 5 पर्यटकांचाही समावेळ होता. सदर दुर्घटनेनंतर जखमींना तातडीनं गोवा सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.

गोव्यातील या भीषण दुर्घटनेनंकर आरोपींविरोधात पोलिसांनी FIR दाखल करत तपास पुढे नेला. अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार ब्युरो ऑफ इमिग्रेशनकडून संपर्क साधला असता दोन्ही आरोपींनी 7 डिसेंबरला पहाटेच्याच इंडिगोच्या (IndiGo Flight) फ्लाईट  6E 1073 नं पळ काढला. जिथं इंडिगोच्या हजारो फ्लाईट मागील काही दिवसांमध्ये रद्द होत आहेत तिथंच, लुथरा बंधूंना देश सोडण्यासाठी नेमकं विमान कसं उपलब्ध झालं, हा प्रश्नसुद्धा आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आगीच्या दुर्घटनेनंतर समोर आलेल्या माहितीत क्लबचा परवानाही बेकादयेशीर असल्याची बाब समोर आली आणि क्लबला परवाने देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी यंत्रणआंनी सुरू केली. बर्च बाय रोमिओ लेन या क्लबला देण्यात आलेले विविध परवाने आणि परवाने देणारे अधिकारी पोलिसांच्या रडारवर आले. सध्या या अधिकाऱ्यांना समन्स पाठवून त्यांची कसून चौकशी केली जात असून, परवाना प्रक्रियेत झालेल्या संभाव्य उल्लंघनाची तपासणी प्राधान्यक्रमाने केली जात आहे.

admin
Author: admin

और पढ़ें