कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध ‘कॅफे अड्डा’ वर निर्भया पथकाने अचानक कारवाई करत मोठा गैरप्रकार उघडकीस आणला आहे. शहरात कॅफेंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी काही ठिकाणी बेकायदेशीर आणि अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार निर्भया पथकाने तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. हा कारवाईनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रुम
झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध ‘कॅफे अड्डा’ मध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रुम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रुम आणि विशेष म्हणजे 350 रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले आहे. या कॅफेमध्ये पथकाने छापा मारल्यानंतर कारवाईदरम्यान कॅफेमध्ये उपस्थित तरुण-तरुणींची एकच धांदल उडाली. काही कॉलेज विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच बाहेरगावातून आलेले ग्राहकही या ठिकाणी आढळले. या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदूरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईची माहिती कळताच शहरातील अनेक कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली.
प्रमुख शहरांपासून गावागावात कॅफे कल्चर चांगलंच वाढल्याचं चित्र
देशभरात आता प्रमुख शहरांपासून गावागावात कॅफे कल्चर चांगलंच वाढलं आहे. काम करण्यासाठी, मित्रमैत्रिणींना भेटण्यासाठी तरुणाईसाठी कॅफे सोयीचे ठरत आहे. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीमध्ये कॅफे हे आंबट शौकिनांचा अड्डा झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध ‘कॅफे अड्डा’ मध्ये अश्लील प्रकार सुरु असल्याची माहिती निर्भया पथकाला मिळाली होती. या माहितीच्या निर्भया पथकाने झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध ‘कॅफे अड्डा’ मध्ये छापा टाकला. योग्य खबरदारी घेत आणि क्लुप्ती करत निर्भया पथकाने ही छापेमारी केली. तोतया ग्राहक बनून निर्भया पथकाने कॅफेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅफे अड्डा’ मध्ये जोडप्यांसाठी स्वतंत्र दोन रुम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रुम आणि विशेष म्हणजे 350 रुपयांत अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात असल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे शहरातील कॅफे चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.








