Search
Close this search box.

चाललंय काय? महाराष्ट्रात गर्भलिंगनिदानाचं मोठं रॅकेट उघड; मध्य प्रदेश कनेक्शन समोर..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

गर्भलिंगनिदान (Sex Detection) हा गुन्हा असला तरीही आजच्या घडीलासुद्धा अनेक गर्भवतींना या चाचणीला सामोरं जावं लागतं आणि आजही या चाचणीनंतर अनेक गर्भपात होतात हे दाहक वास्तव आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील जालन्यातील भोकरदन तालुक्यातील गवळीवाडी नांजा इथं अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात पाच आरोपींना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. इथं गोठ्यात अनेक वर्षांपासून अवैधरित्या गर्भलिंगनिदान सुरू असल्याची माहिती समोर आली. धक्कादायक बाब म्हणजे घटनास्थळी पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी तिथं तीम महिला गर्भलिंगनिदानासाठी आल्याचं आढळलं.

औषधं थेट मध्य प्रदेशातून

सदर प्रकरणात अटकेच असणाऱ्या आरोपींची पोलीस कोठडी बुधवारी संपली आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. यानंतर सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. तपासासाठी पोलीस पुन्हा कोठडी घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं आणि या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. इथं सुरू असणाऱ्या अवैध गर्भलिंगनिदानासाठी लागणारी औषधं थेट मध्य प्रदेशातून येत असल्याचे समोर आलं आहे.

 

गुन्ह्यात शेतमालक, डॉक्टर, गोळ्या पुरवणारा, एजंट अशा 5 जणांचा समावेश आहे. आरोपींमध्ये सतीश सोनवणे, केशव गावंडे, बुलढाण्यातील मेडिकलचालक योगेश चांदा, अनंता चोबे, गोठामालक समाधान सोरमारे यांचा समावेश आहे. योगेश चांदा हा अवैध गर्भलिंगनिदानासाठी गोळ्या पुरवत होता. त्याची ‘फोन पे हिस्ट्री’ पोलिसांनी तपासली असता धागेदोरे थेट मध्य प्रदेशपर्यंत गेले. 3 वर्षांपूर्वीची लिंक उघड झाली असून आता गुन्हेगारांची कसून चौकशी केली जात आहे.

मेडिकल व्यावसायिक आणि एजंट यात सक्रिय

अवैध गर्भलिंगनिदान प्रकरणात वापली जाणारी औषधं मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधून येत होती. मध्यप्रदेशातील काही मेडिकल व्यावसायिक आणि एजंट यात सक्रिय आहेत. ही लिंक स्थानिक गुन्हे शाखेनेतीन वर्षांपूर्वी उघड केली होती. आता या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरु केली आहे.

दरम्यान गर्भलिंगनिदान होणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी पहिली धाड टाकली असता घटनास्थळावरून लिंगनिदान करणारं यंत्र, टेस्ट ट्यूब, गर्भपाताच्या गोळ्या,  मोबाईल, इंजेक्शन जप्त करत पोलिसांनी तिथं असणाऱ्या तीन महिलांचाही जबाब नोंदवला होता. आता या प्रकरणात पुढील तपास नेमका कोणत्या दिशेनं होतो, या रॅकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे आणि आरोपींना कोणती शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

admin
Author: admin

और पढ़ें