Search
Close this search box.

Bus Accident: संपूर्ण बस जळून खाक, 45 जणांचा मृत्यू; पण तो एकटाच वाचला कसा?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सऊदी अरेबियातील मक्का–मदीना मार्गावर झालेल्या भीषण अपघाताने जगभरातील उमराह यात्रेकरूंमध्ये खळबळ माजवली आहे. उमराहहून परतणाऱ्या हैदराबादच्या यात्रेकरूंची बस डिझेल टँकरला धडकली आणि क्षणभरात आग लागून 45 जणांना जीव गमवावा लागला. पण या भीषण अपघातातून फक्त एकच व्यक्ती जिवंत बाहेर आली आणि म्हणजे 24 वर्षीय मोहम्मद अब्दुल शोएब. या अपघाताचा सर्वात हृदयद्रावक भाग म्हणजे शोएब त्याच्या संपूर्ण कुटुंबाला गमावून एकटाच उरला, आणि त्याचे प्राण वाचण्यामागे कारण होते त्याला झोप न येणे.

रात्री झोप नाही आली आणि… 

रिपोर्टनुसार, बसमध्ये बसलेले सर्व 45 यात्रेकरू गाढ झोपेत होते. फक्त शोएबला झोप येत नव्हती. त्यामुळे तो ड्रायव्हरच्या बाजूला येऊन बसला. कदाचित दोघांमध्ये संवादही सुरू होता. अचानक, एक वेगाने येणाऱ्या डिझेल टँकरने बसला भयानक धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बस क्षणात पेटली.
जागे असलेले शोएब आणि ड्रायव्हर या   खिडकीतून तात्काळ उडी मारून जीव वाचवला. पण उर्वरित सर्व जण झोपेत असल्याने बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.

शोएबने पहाटे साडेपाच वाजता आपल्या नातेवाइकाला फोन करून सांगितले की “मी वाचलो… बाकी सर्व जळून गेले.” सध्या तो मदीना येथील जर्मन हॉस्पिटलच्या ICU मध्ये आहे.

उमराहसाठी गेलेल्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू

हैदराबादच्या नटराजनगर कॉलनीतील शोएब एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होता. तो आपल्या आई-वडील, आजोबा,  काका आणि त्यांच्या कुटुंबासह उमराह यात्रेसाठी गेला होता. पण या अपघातात त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला. जिवंत परतल्याचा आनंदही त्याला मिळाला नाही, कारण उरलेले सर्वजण त्याच्याच डोळ्यासमोर नाहीसे झाले. स्थानिक लोकांच्या मते, “शोएबचे जिवंत राहणे हे चमत्कारापेक्षा कमी नाही.”

एका कुटुंबाचे 18 सदस्य एका क्षणात संपले

या दुर्दैवी अपघातात सैयद राशिद नावाच्या हैदराबादच्या तरुणावर तर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला. राशिद यांनी आपल्या परिवारातील तब्बल 18 सदस्यांना गमावले. मृतांमध्ये वडील, आई, भाऊ–भावजय त्यांची मुले,  इतर नातेवाईक असे अनेक जण होते. राशिद भावुक होत म्हणाले की,  “त्यांना विमानतळावर सोडताना मला कल्पनाही नव्हती की ही शेवटची भेट असेल. मी त्यांना एकत्र प्रवास करू नका, असे सांगितले होते… पण त्यांनी ऐकले नाही. किमान काही तरी वाचले असते.”

हादरवून टाकणारी शोकांतिका

हा संपूर्ण अपघात उमराह यात्रेच्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना मानली जात आहे. एका क्षणात 45 जीव संपले, तर एकुलता एक वाचलेला युवक आता वैद्यकीय उपचारांसोबतच प्रचंड मानसिक धक्काही सहन करत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें