इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी टी 20 क्रिकेट लीग आहे. आयपीएलचं पुढील वर्षी 19 वं सीजन आहे आणि त्यासाठी आतापासूनच क्रिकेट रसिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आयपीएल 2026 च्या ऑक्शनपूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांच्या फ्रेंचायझीने रिटेन, रिलीज आणि ट्रेड केलेल्या सर्व खेळाडूंची लिस्ट जाहीर करायची होती. त्याप्रमाणे आता आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी सीजनपूर्वी त्यांच्या रिटेन आणि रिलीज खेळाडूंची लिस्ट जाहीर केलेली आहे.
मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी :
1. बेव्हॉन जेकब्स
2. कर्ण शर्मा
3. केएल श्रीजीथ
4. लिझाद विल्यम्स
5. मुजीब उर रहमान
6. पीएसएन राजू
7. रीस टोपली
8. विघ्नेश पुथूर
मुंबई इंडियन्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी :
1. एएम गझनफर
2. अश्वनी कुमार
3. कॉर्बिन बॉश
4. दीपक चहर
5. हार्दिक पंड्या
6. जसप्रीत बुमराह
7. मयंक मार्कंडे (ट्रेड )
8. मिचेल सँटनर
9. नमन धीर
10. रघु शर्मा
11. राज अंगद बावा
12. रॉबिन मिन्झ
13. रोहित शर्मा
14. रायन रिकेल्टन
15. शार्दुल ठाकूर (ट्रेड इन)
16. शेरफेन रदरफोर्ड (ट्रेड इन)
17. सूर्यकुमार यादव
18. टिळक वर्मा
19. ट्रेंट बोल्ट
20. विल जॅक्स
ट्रेड केलेला खेळाडू :
1. अर्जुन तेंडुलकर







