सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसतोय. मंगळवारी सोन्याचे दरांनी मोठी उसळी घेतली होती. मात्र आज मौल्यवान धातुचे दर घसरले आहेत. आज सोन्याचे दर काय आहेत, जाणून घ्या.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे गव्हर्नर स्टीफन मिरॉन यांनी अलीकडेच वाढती बेरोजगारी आणि मंदावलेली महागाई यावर उपाय म्हणून ०.५० टक्के व्याजदरात लक्षणीय कपात करण्याचे संकेत दिले आहेत. तसंच, अमेरिकेत शटडाउनची भीती कमी झाल्यामुळं डिसेंबरच्या बैठकीत फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची वाढती अपेक्षा आहे. त्यामुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे.
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली असून 1,25,510 रुपयांवर स्थिरावले आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 300 रुपयांची घट झाली असून 1,15,050 रुपयांवर पोहोचले आहे. तसंच, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घसरण झाली नसून 94,130 रुपयांवर पोहोचले आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
– 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,15,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,25,510 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 94,130 रुपये
– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,505 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 11,551 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,413 रुपये
– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 92,040 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 1,15,050 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 75,304 रुपये
– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,15,050 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,25,510 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 94,130 रुपये








