देशभरात सध्या हवामानात सातत्यानं बदल होत असून, (Cyclone Montha) मोंथा चक्रीवादळासह अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वाऱ्याची दिशा बदलत असल्यानं याचा परिणाम फक्त आंध्र आणि ओडिशामध्येच नव्हे तर, महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागासह विदर्भापर्यंत दिसून येणार आहेत. केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशात एकिकडे किनारपट्टी भागामध्ये वादळी पावसाचा इशारा असतानाच पर्वतीय राज्यांमध्ये हळुहळू थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्राच्या कोणत्या भागांमध्ये पाऊसधारा?
दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि थेट गोव्यासह मराठवाड्यात ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहणार असून, मेघगर्जनेसह मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. पूर्व विदर्भात तुलनेनं पावसाचा जोर अधिक राहणार असून इथं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रामुख्यानं चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्यांमध्ये पावसाचं प्रमाण अधिक असेल. तर, उर्वरित राज्यात वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण पट्टा, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर इथं मध्यम स्वरुपातील पाऊस आणि पहाटेच्या वेळीचा गारठा असं संमिश्र हवामान पाहायला मिळेल.
मुंबईत दिवसा पावसाच्या सरींची शक्यता…
दिवाळी सरल्यानंतरही पावसाचा मुक्काम कायम असून, मुंबईत नेमका कोणता ऋतू सुरुय याचाच थांगपत्ता लागेनासा झाला आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकत असून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज असून परिणामी शहरात बुधवार आणि गुरुवारी मुंबईत दिवसासुद्धा कधीही कुठंही या पाऊसधारांची शक्यता आहे.