Search
Close this search box.

सांगलीतील साखर कारखान्याचे नाव बदलले, महाराष्ट्राचे राजकारण पेटले

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सांगलीत पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. कारण जतच्या साखर कारखान्याच्या कमानीवरील राजाराम बापू पाटलांचं नाव हटवून अज्ञातांनी विजयसिंह डपळे साखर कारखाना केल्यानं नव्या वादाला तोंड फुटल आहे. साखर कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कमानीवर राजाराम बापू पाटील साखर कारखाना असं नाव होतं. मात्र, रात्रीत कमानीवर राजे विजयसिंह डफळे यांचं नाव टाकण्यात आले. साखर कारखान्याच्या कमानीवरील नाव बदलल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विजसिंह राजे डफळेंच्या नावाचं कमानीवरील डिजिटल बॅनर काढले.

सांगलीत जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकरांमधला वाद सर्वश्रूत आहे. दरम्यान या घटनेनंतर पडळकरांनी कमानीवरचं नाव बदलणा-या अज्ञातांना पाठिंबा दिलाय. कारखान्याच्या सभासदांसोबत न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचा इशारा देखील गोपीचंद पडळकरांनी दिला आहे. जतमधील साखर कारखाना जयंत पाटलांनी कवडीमोल भावात विकत घेतल्याचा आरोप देखील गोपीचंद पडळकरांनी केलाय. तसंच संबंधित कारखाना जयंत पाटलांनी सभासदांना परत करावा असं आव्हान देखील जयंत पाटलांना पडळकरांनी दिले.0

काय आहे साखर कारखान्याचा इतिहास?

जतमधील कारखाना उभारणीत विजयसिंह राजे डफळेंनी पुढाकार घेतला असल्यानं कारखान्याला त्यांचं नाव देण्यात आलं.  2012मध्ये जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.  लातूरच्या विलास सहकारी साखर कारखान्याकडून जतचा कारखाना 59 कोटी 75 लाखांना खरेदी केला. पुढे काही महिन्यांनंतर कारखाना आवसायनात निघाल्यानं राज्य शिखर बँकेकडून कारखान्याचा लिलाव करण्यात आला.  राजारामबापू कारखान्यानं विजयसिंह डफळे कारखाना विकत घेतला.

जतमधील साखर कारखान्यावरून पुन्हा एकदा वादाची चिन्ह आहेत. साखर कारखान्याच्या कमानीवरील नाव कोणी बदललं? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर दुसरीकडे आमदार पडळकरांनी नाव बदलणा-याना खुला पाठिंबा दिलाय. त्यामुळे या साखर कारखान्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे.

admin
Author: admin

और पढ़ें