Search
Close this search box.

Nilesh Ghaywal: आधी बॅंक खाती गोठवली; नंतर पासपोर्ट रद्द केला, आता घायवळची BOSS नंबर प्लेटची ऊसाच्या शेतात लपवलेली कारही घेतली ताब्यात

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुण्यातील गुंड निलेश घायवळची (Nilesh Ghaywal) आणखी एक चार चाकी कार पोलिसांनी जप्त केली आहे. उसाच्या शेतात ही चारचाकी (Car) कार लपवून ठेवली होती. अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये असलेल्या एका गावात ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती. ८०५५ नंबर असलेल्या या गाडीला “BOSS” अशी नंबर प्लेट लावलेली होती. पुणे पोलिसांनी थेट जामखेडमधील खर्डा गावात जाऊन ही कारवाई केली आहे. याआधी निलेश घायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकला होता. त्याची बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत.

Nilesh Ghaywal: घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द, प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी

मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला गुंड निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडला आहे. त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवण्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आले. त्यानंतर  निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले होते. निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे. पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत.

Nilesh Ghaywal: घायवळसह त्याच्या कुटुंबीयांची 10 बँक खाती गोठवली

पुणे शहरातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्यासह त्याच्या कुटुंबीयांची 10 बँक खाती काही दिवसांपूर्वी गोठवण्यात आली आहेत. बँक खात्यात 38 लाख 26 हजार रुपये असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. दरम्यान, नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांचे आर्थिक स्रोत बंद करून त्यांना, वठणीवर आणण्याचा पोलिसांनी हा प्रयत्न होता.

पुणे पोलिसांनी विविध बँक प्रशासनासोबत पारव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या कुटुंबीयांतील 10 जणांची बँकखाती असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या पत्रानुसार संबंधित बँक प्रशासनाने निलेश घायवळ, शुभांगी घायवळ, स्वाती निलेश घायकळ, कुसुम घायवळ, पृथ्वीराज एंटरप्रायझेस ही बँक खाती गोठवली आहेत. 10 बँक खात्यांतील 38 लाख 26 हजार रुपये फ्रीज करण्यात आले आहेत. त्यामुळे पुणे पोलिसांच्या एनओसीशिवाय आता संबंधितांना खात्यातील रक्कम काढता येणार नसून, कोणत्याही बँकेचा आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

admin
Author: admin

और पढ़ें