Search
Close this search box.

महाराष्ट्रातल्या इंजिनिअर्सची कमाल! पुण्यात धरणाच्या पाण्यावर बांधणार 8 पदरी पूल, 82 गावांतून जाणारा रस्ता

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

पुण्यात रिंग रोडबाबत एक नवीन अपडेट समोर आली  आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे रिंग रोड प्रकल्प हा ग्रीन कॉरिडॉर विकसित करण्यासाठी प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जाणार आहे. आता प्रकल्पाच्या कामासाठी चक्क धरणात पुल उभारण्यात येणार आहे.

रिंगरोडचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जाणाऱ्या पश्चिम भागातील मार्गावर 8 पदरी उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल म्हणजे अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना ठरणार आहे. पुणे रिंगरोडच्या पश्चिम भागातील सांगरुण आणि मालखेड या गावांना जोडण्यासाठी हा सुमारे 650 मीटर लांबीचा उड्डाणपुल थेट धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बांधला जाणार आहे. एप्रिल महिन्यापासून हे काम सुरू करण्यात आले असून आठ पदरी असणार आहे. तसंच, खांबामघ्ये 40 ते 60 मीटरचे अंतर ठेवण्यात येणार आहे.

या पुलाच्या उभारणीसाठी पाइल फाउंडेशन या विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसंच, धरणाच्या पाण्यातच खड्डे घेऊन खांब उभारले जात आहेत. या पुलासाठी 273 खड्डे खणले जाणार असून यापैकी 156 खड्डे जमिनीवर तर 120 खड्डे पाण्यात असतील. आत्तापर्यंत यातील 59 खड्डे घेण्याचे काम पूर्ण झाले आहे.

पुण्याचा रिंग रोड पश्चिम आणि पूर्व अशा दोन भागांत साकारला जाणार आहे. अडीच वर्षांत हा रिंग रोड पूर्ण करण्याचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) नियोजन आहे. पुरंदर, हवेली, भोर, खेड, मावळ, मुळशी या सहा तालुक्यांतील 82 गावांमधून हा रिंग रोड जात आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल ५५ हजार ६२२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मार्ग द्रुतगती असल्याने स्थानिक ग्रामस्थांना त्याचा थेट उपयोग होणार नसला तरी, भविष्यात या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांना खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे विहंगम दृश्य अनुभवता येणार आहे. ‘एमएसआरडीसी’चे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी नुकतीच पश्चिम रिंगरोडच्या कामाची पाहणी करून कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.

admin
Author: admin

और पढ़ें