Search
Close this search box.

Mumbai News: मुंबईतील राममंदिर स्टेशनवर तरूणाने केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला अन्…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती (Man helps deliver baby) वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली.(Man helps deliver baby)

मिळालेल्या माहितीनुसार, काल (बुधवारी) रात्री १२.४० च्या सुमारास एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली. तरूणाने डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.(Man helps deliver baby)

Man helps deliver baby: नेमंक काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सुमारे १२.४० वाजता गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेला लोकल ट्रेनमध्ये अचानक तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती मदतीसाठी आरडाओरडा करू लागली, मात्र डब्यातील प्रवाशांपैकी कोणीही तिला तत्काळ मदत केली नाही. याच वेळी डब्यात प्रवास करणाऱ्या विकास दिलीप बेद्रे या तरुणाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ट्रेनची इमर्जन्सी चैन ओढली, ज्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर थांबवण्यात आली. त्या क्षणी महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती, बाळ अर्धवट बाहेर आले होते आणि प्रसूती अर्धवट अवस्थेत अडकली होती. दरम्यान, राम मंदिर स्थानकावर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हत्या, तसेच रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागणार होता. ही नाजूक स्थिती पाहून विकास बेद्रे यांनी वेळ न दवडता तात्काळ आपल्या मैत्रिणीला, डॉ. देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला आणि परिस्थितीची माहिती दिली. पुढे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रसूतीदरम्यान महिलेची मदत केली, ज्यामुळे आई आणि बाळाचे प्राण वाचले.

Man helps deliver baby: मध्यरात्री राम मंदिर स्थानकात बाळाच्या रडण्याचा आवाज अन् अभिनंदन

डॉ. देविका देशमुख यांनी मध्यरात्रीचा वेळ असूनही विकास बेद्रे यांचा व्हिडिओ कॉल तात्काळ उचलला आणि परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी विकासला शांतपणे प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक सूचना काळजीपूर्वक पाळली. वैद्यकीय शिक्षणाचा कोणताही अनुभव नसतानाही त्यांनी अपवादात्मक धैर्य आणि संयम दाखवला. या तणावपूर्ण आणि जीवघेण्या प्रसंगी विकास यांनी दाखवलेले अफाट धैर्य आणि समयसूचकता हे खरोखर कौतुकास्पद ठरले. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री सव्वा एक ते दोनच्या दरम्यान बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला. त्या महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला, आणि उपस्थित प्रवाशांसह रेल्वे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले, जिथे दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

admin
Author: admin

और पढ़ें