Search
Close this search box.

ठाकरे बंधूंची दिवाळीही एकत्र; मनसेचा दीपोत्सव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्याहस्ते उद्घाटन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

 राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच तयारी सुरू झाली आहे. एकीकडे राजकीय पक्ष आपली मोर्चेबांधणी करत आहेत, दुसरीकडे निवडणूक आयोग आणि प्रशासनानेही कंबर कसली आहे. त्यातच, राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आज निवडणूक आयोगाकडे (Election) जाऊन आपले निवेदन दिलं आहे. त्यानिमित्ताने आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधूंची ही सातवी भेट आहे. त्यामुळे, शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंद व समाधान आहे. त्यातच, आता दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंचा दिवाळी धमाका पाहायला मिळणार आहे.

मनसेच्यावतीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो, यंदाही दिवाळीच्या अगोदर दीपोत्सव सोहळा संपन्न होणार असून यंदाचा हा सोहळा खास असणार आहे. कारण, शिवाजी पार्कवरील मनसेच्या दीपोत्सव 2025 सोहळ्याचे उद्धाटन यंदा चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. उद्धव ठाकरेंचं नाव मनसेच्या दीपोत्सव पुत्रिकेत छापल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून ठाकरे बंधू दिवाळीतच राजकीय धमाका करतात की काय याची देखील चर्चा होत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना आणि मनसे एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे. केवळ, औपचारीत घोषणा आणि जागावाटप बाकी असल्याचा अंदाज राजकीय जाणकार आणि दोन्ही पक्षातील पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

शाळेतील तिसरी भाषा मराठा असावी, या मुद्द्यावरुन एकत्र येत ठाकरे बंधूंमधील दुरावा कमी झाला असून गेल्या 2 महिन्यातील जवळीक सर्वांनाच आश्चर्य वाटणारी आहे. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावर उद्धव ठाकरेंची भेट असो किंवा, मातोश्री बंगल्यावर राज ठाकरेंचे स्वागत असो. गेल्या काही दिवसांत ठाकरे बंधूंच्या जवळपास 7 ते 8 वेळा भेटी झाल्या आहेत. त्यात, दोनवेळा बंद दाराआड चर्चाही झाली असून आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-मनसे पुन्हा एकत्र येत आहे. तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेही पुन्हा एकत्र येत आहेत. त्यामुळे, दिवाळीत शिवाजी पार्कवरुनच राजकीय धमाका होतो की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षातील पक्ष प्रमुखांचे शिष्टमंडळ उद्या बुधवार 15 ऑक्टोंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांची भेट घेणार आहेत. येथे मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य निवडणूका अशा विविध प्रश्नांसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोकलिंगम आणि मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर, सर्व नेत्यांची पत्रकार परिषद घेतली जाईल.

admin
Author: admin

और पढ़ें