रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये वर्दीला लाज आणणारी घटना घडली आहे. (Raigad Crime News) 18 वर्षाखालील बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोक्सोअंतर्गत (POCSO) केसमध्ये कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने 5 लाखांची लाच मागितली. त्यातील 3 लाख रुपये स्वीकारताना त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना समोर आली आहे. विशाल वाघाटे असे आरोपी पोलीस हवालदाराचे नाव आहे. ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.
राज्यभरात सध्या वारंवार लैंगिक अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या घटनासमोर येत असताना रक्षकच भक्षक झाल्याचे समोर आले आहे .या घटनेमुळे नागरिकांमधून मोठा संताप व्यक्त होतोय .
नेमके प्रकरण काय?
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये भ्रष्टाचाराची गंभीर घटना समोर आली आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार विशाल वाघाटे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडलं आहे. ACB ने दिलेल्या माहितीनुसार, लाचखोर पोलीस हवालदाराने पोक्सो अंतर्गत प्रकरणात आरोपी विरोधात होणारी कारवाई टाळण्यासाठी आणि संबंधित पक्षाला मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली होती .त्यापैकी तीन लाख रुपये स्वीकारताना संबंधित हवालदार ACB च्या जाळ्यात आला . 18 वर्षाखालील बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनांमधील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी पोक्सो कायदा आहे . पोक्सो कायद्याअंतर्गत
होणारी कारवाई न करण्यासाठी हा हवालदार लाच स्वीकारत होता . मागितलेल्या पाच लाख रुपये लाचे पैकी तीन लाख रुपये स्वीकारताना ACB अधिकाऱ्यांनी या पोलीस हवालदाराला ताब्यात घेतले आहे . सध्या महाड पोलीस ठाण्यात या हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील कारवाई सुरू आहे .
तुझे कॅरेक्टर खराब करेन .. पोलिसाकडून तरुणाला धमकी
दुसरीकडे बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत शेतातून विद्युत तारा ओढण्याचे काम सुरू असताना पोलीस आणि स्थानिक तरुणासोबत शाब्दिक बाचाबाची झाली .तुझे कॅरेक्टर खराब करेन असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यानेच तरुणाला धनकावल्याचा प्रकार समोर आला आहे .
बीडच्या नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत काही शेतकऱ्यांच्या शेतातून 220 केव्ही विद्युत तारा ओढण्याचे काम आणि विद्युत खांब उभारणीचे सुरू आहे. मात्र हेच काम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी मावेजासाठी सदरील काम अडविले त्यामुळे रीतसर तक्रार नोंदवा असे पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणच्या स्थानिकांना सांगितले. मात्र या घटनेचा व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाची आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी पोलिसाने एका तरुणाला तुझे कॅरेक्टर खराब करेल अशी धमकी दिली.. कानडी घाट या परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे. पोलिसांकडून त्यांची बाजू समजून घेतली असता आम्ही रीतसर शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना तक्रार देण्यास सांगितले होते. मात्र काही जण आमच्याशी हुज्जत घालून व्हिडिओ काढत असल्याने आम्ही बोललो असल्याची कबुली देखील दिली.
