मागील काही दिवसांपासून मुंबईच्या पवई भागात नायजेरियन आणि इतर परदेशी नागरिकांचा संशयास्पद वावर दिसू लागला होता. याबाबत बृहन्मुंबईचे पोलिस आयुक्त देवन भारती यांनी सतर्कता बाळगण्याचे आणि अवैध हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते. यानंतर पवई पोलिसांनी गुप्त माहिती गोळा केली. यात त्यांना बेकायदेशीर व्यक्तींच्या राहणीमान आणि दिवसभराच्या हालचालींची माहिती मिळाली. यामुळे अवैध वास्तव्याच्या नेटवर्कचा फांडाफोड झाला आणि त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची तयारी झाली. काय घडला नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
काय घडली नेमकी घटना?
1 ऑक्टोबर 2025 रोजी पवई पोलिसांनी मरोळ येथील हॉटेल ड्रीम इन प्राईम, अकॅडमी स्कूलजवळ छापा टाकला. तपासात युगांडा आणि केनियातील नऊ महिलांचा उलगडा झाला, ज्यांचे व्हिसा संपले असतानाही त्या ओळख लपवून राहत होत्या. या महिलांनी परवानगीविरहित राहणीमान चालवले होते, ज्यामुळे अवैध वास्तव्याचा गुन्हा दिसून आला. पोलिसांनी तात्काळ त्यांना ताब्यात घेतले आणि कायद्याच्या चौकटीत आणले.
महिलांची यादी आणि कारवाई
या महिलांमध्ये ग्लोरिया नामूंगे, नबीसुबी इस्तर, सुसान वॉम्बुयी कुरिया, बेथ एनजेरी , सेलिस्टेन वेरे), सोविनया मरे मेवडे ), जॉयसे वंजिरो नगुकू , सरह वांजिको मुगेरा आणि नेली चेपकोरिया मेसडिंच यांचा समावेश आहे. सर्वजण युगांडा किंवा केनियाच्या नागरिक आहेत. पवई पोलिसांनी त्यांच्यावर हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, महिला पोलिसांच्या ताब्यात ठेवून पुढील तपास चालू आहे.
मुंबई पोलिस आयुक्त देवन भारती, सह आयुक्त सत्यनारायण, अपर आयुक्त परमजित सिंह दहिया, उप आयुक्त दत्ता नलावडे आणि सहाय्यक आयुक्त प्रदिप मैराळे यांच्या सूचनांनुसार घडली. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक अमोल वाघमारे, उप निरीक्षक गणेश आव्हाड आणि इतर कर्मचारी – जसे शितल लाड, अश्विनी वर्दे, मारोती सुरनर, लांडगे, खंडागळे, जयदेव चव्हाण, प्रदिप शिरसाट आणि हनुमंत वारंग – यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांचं सर्व स्तरातून कौतुक होतंय.
