2025 वर्षे हे गुंतवणुकदारांसाठी गोल्डन टाइम ठरलं आहे. या वर्षात सोन्याच्या दरात 50 टक्के तेजी आली आहे. देशांतर्गंत बाजारात सोनं 1 लाख 20 हजार रुपयांवर पोहोचलं आहे. तर कॉमेक्सवर सोन्याने 4000 डॉलर प्रति औंस पार केले आहे. आजदेखील सोन्याचे दर चांगलेच गगनाला भिडले आहेत. आजचा सोन्याचा दर जाणून घेऊयात.
सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. 2008च्या आर्थिक मंदीच्या वेळी जानेवारी 2008 ते 2011 या दरम्यान 100 टक्के तेजी आली होती. त्यानंतर 2020मध्ये कोविडनंतरही सोन्याचा दर 53 टक्क्यांनी वाढला होता. 2025मध्ये पुन्हा एकदा सोन्याचा वाढला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,150 रुपयांनी वधारला आहे. जाणून घेऊयात सोन्याचे आजचे दर
आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,150 रुपयांची वाढ झाली असून 1,23,170 रुपयांवर स्थिरावलं आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,050 रुपयांची वाढ झाली असून 1,12,900 रुपयांवर स्थिरावले आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 560 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं एक तोळा सोनं 92,380 रुपयांवर स्थिरावलं आहे.
आजचा सोन्याचा भाव काय?
– 10 ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12, 900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,170 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,380 रुपये
– 1 ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 11,290 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 12,317 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 9,238 रुपये
– 8 ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 90,320 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 98, 536 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 73, 904 रुपये
– मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर? (Today Gold Rate in Mumbai Pune)
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,12, 900 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,23,170 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 92,380 रुपये
